पान:गोमंतक परिचय.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय समजत नाही. शिक्षणक्रमाचे विषय व त्यांची अंतीम सीमा फारसी बदललेली नाही. परंतु, 'काही तरी केले' असे म्हणण्यासाठी इकडचे तिकडे व तिकडचे इकडे असे क्षुल्लक फेरफार वारंवार होत आले आहेत. अर्थात् मागे आम्ही दिलेला प्रोग्राम आज तंतोतंत पाळला जात नाही हे सांगायला नकोच.. शिक्षकांची पात्रता व शिक्षणाचा दर्जाः--पणजीच्या लिसेवांतील शिक्षक उच्च नॉर्मल कॉलेज, युनिव्हर्सिटी, किंवा इतर उच्च शिक्षण घेतलेले असतात. आणि म्युनिसिपाल लिसेवांतील शिक्षक लिसेव सेंत्रालचा अभ्यासक्रम पुरा केलेले असतात. अर्थात् त्यांच्या कायदेशीर पात्रतेविषयी शंका घेणे शक्यच नाही. परंतु शिक्षकाची कसोटी लावायचे खरे साधन म्हणजे विद्यार्थ्यांचे त्यांजवरील प्रेम व आपलेपणा हेच होय. या साधनाच्या कसोटीला उतरणारे प्रोफेसर आमच्या लिसेवांत बरेच विरळा आहेत. धर्मभेद, राजकीय पक्षभेद, स्थानिक वैमनस्ये, इत्यादि बाबींचा प्रभाव परिक्षांच्या निकालावर बराच होत असतो. आणि त्यामुळे विशेषतः हिंदूंचेच नुकसान होत असते, ही मोठ्या खेदाची गोष्ट आहे. मुलाला शाळेत घालायचे ठरतांच, त्याच्या पुस्तकाविषयीं व जेवणाखाण्याविषयी जी काळजी घ्यावी लागते, तिच्याही अगोदर शिक्षकांच्या मेहरनजरेची काळजी पालकांना बाळगावी लागते व त्यासाठी, मुलांनी करावयाच्या अभ्यासापूर्वी, पालकांनी त्यांच्या शिक्षकांच्या नात्या गोत्याचा, स्नेहसंबंधांचा व राजकीय मतांचा अभ्यास करावा लागतो. . अशा व्यवस्थेतून मिळणारे शिक्षणही तशाचप्रकारचे असल्यास नवल नाही. शिक्षणाच्या दर्जाविषयी सांगायचे झाल्यास, ते व्यावहारिक उपयुक्ततेपेक्षां पुस्तकी लटपटपंचीकडेच विशेष कललेले असते इतकें सांगितले म्हणजे बस्स होईलं.