पान:गोमंतक परिचय.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें. मुळच्या ६१ हिंदु मुलांऐवजी १९२०-१९२१ साली त्यांची संख्या तीनहीं लिसेवांत मिळून ३०८ ची होती व १९२७-१९२८ सांत तीच २९६ आहे. आतांशा लिसेवांत कमाल वयाची अट लागू केल्यामुळे, पुष्कळ हिंदुमुलांना लिसेवांत प्रवेश मिळत नाहीं हे लक्ष्यात घेतले पाहिजे. हिंदूच्या प्रयत्नाचे प्रमाणच पहावयाचे असल्यास, तें हिंदूंतील परिक्षेत पास होणाऱ्या मुलांची संख्या पाहिल्यास लागलीच दिसून येईल. १९२०-१९२१ साली लिसेवांत शिकणारे व बाहेर शिकून परिक्षेस बसलेले हिंदू ३४४ होते व त्यांतून २१४ यशस्वी झाले. म्हणजे शेकडा ६२ हे प्रमाण पडते. शिक्षणाची सूत्रे ज्या प्रोफेसर वर्गाच्या हातांत आहेत, त्याची हिंदुजनेतकडे जी दृष्टि आहे ती फारशी समाधानकारक नसतांना देखील हे प्रमाण एकंदर प्रमाणापेक्षा शेकडा ११ नी जास्त आहे, हे लक्ष्यात ठेवले पाहिजे. उल्लेखित साली एकंदर १०५९ मुलांपैकी ६४२ म्हणजे शेकडा ५१ पास झाली होती. या शिक्षकांची संख्याः -१९२७-१९२८ साली लिसेव सेंत्रालांत एकंदर १९, म्हापशेंच्या लिसेवांत व मडगांवच्या लिसेवांत ४ असे प्रोफेसर होते. फीचे प्रमाणः-पहिल्या व दुसऱ्या वर्षाला ( इयत्तेला ) प्रत्येकी ३४४४४७; तिसऱ्या, चौथ्या व पांचव्या वर्षांनां (इयत्तांना ) प्रत्येकी ४८ रु. आणि सहाव्या व सातव्या वर्षांनां ( इयत्तांनां ) प्रत्येकी ६१४११४७ असी फी पडते. बाहेर शिकून परिक्षेलाच येणाऱ्या मुलांस दुसऱ्या व तिसऱ्या इयत्तांना प्रत्येकी २८४९०, चवथ्या व पांचव्या इयत्तांना प्रत्येकी ४०४४४७; आणि सहाव्या व सातव्या इयत्तांनां प्रत्येकी ५२४४४७ इतकी फी आहे; तसेच पहिल्या तीनही इयत्तांच्या संयुक्त परिक्षेस ४८४१३४, चौथ्या व पांचव्या वर्षांच्या संयुक्त परीक्षेला ६७४११०३ आणि शेवटचा दोन वर्षांच्या संयुक्त परिक्षेला ८६०९४ असी फी आहे. अलीकडचा गोंधळः-पोतुगालांत रिपब्लिकची घडी अजून नीटशी बसली नसल्याने, वारंवार अधिकारक्रांत्याच नव्हेत तर इतर प्रकारच्या क्रांत्याही तेथें संख्याबद्ध होतच आहेत. अधिकारावर आलेल्या प्रत्येक मंत्रिमंडळाला असे वाटते की, शिक्षणाच्या बाबतीत काही तरी सुधारणा न केल्यास पूर्वीच्या मंत्रिमंडळापेक्षा आपला दर्जा कमी ठरेल. अर्थात्च अलीकडच्या चार पांच वर्षांत दुय्यम शिक्षणविषयक रेग्युलेशन बऱ्याच वेळां बदलले असून इतका गोंधळ झाला आहे की, आज मितीस त्यापैकी कोणता कायदा लागू आहे हे दुय्यम शिक्षणांतील तज्ज्ञांना देखील नीटसें