पान:गोमंतक परिचय.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय २ ल्याटिन भाषाः--( नाही) ३ फ्रेंच भाषाः--भाषाविषयांच्या शाखेतीलच अभ्यासक्रम. ४ इंग्रजी भाषा--अवगत अभ्यासाची उजळणी, वाचन, भाषांतर; वाचलेल्या धड्यांचा तोंडी व लेखी सारांश, निबंध लेखन, व्याकरण इ. ५ इतिहास:--भाषाशाखेपेक्षा जरा कमी विस्तृत असा पोर्तुगालचा इतिहास व पोर्तुगाल देशांतील शास्त्रीय शोधांचा इतिहास. ६ तत्वज्ञानः--भाषाशाखे इतकेंच.. ७ भूगोलः--भाषाशाखेप्रमाणेच. ८गणीतविद्याः--पूर्णांक व निरनिराळ्या अंक पद्धति; Numeros irracionais, calculo de aproximagao व्याज, चक्रवाढ व्याज, डिस्काउंट, आन्नु। इदादीश ; शेअर्स, राखे, सरकारी कर्ज, हुंडणावळ; ऋण व काल्पनिक संख्या; य-अक्ष+ब याचा उपयोग; साध्या समीकरणाचे व वर्गसमीकरणाचें डिस्कशन; वर्ग समीकरणाचे डिस्कशन; वर्ग समीकरणापेक्षां वरिष्ट समीकरणाची उदाहरणे; Calculo infinitessimal, teoria de limites, derivada; noção integral ATETI त्रिकोण मिति संपूर्ण; Geometria sintética e analitica; Cosmografia ( leis de Kepler ) s 1973:--Projecções ortogonais e leis completas de perspectiva; Desenho topográfico. हा अभ्यासक्रम तूर्त बदलला आहे खरा. परंतु त्या फेरवदलाने विषयांत कांहीं कमी जास्त झाले नाही तर केवळ त्यांची वाटणी जराशी भिन्न झाली आहे. दुय्यम शिक्षणाच्या कोर्साचा मगदूर बाह्य प्रदेशांतील विद्वानांच्या लक्ष्यांत येण्यासाठी हा अभ्यासक्रम द्यावा लागला आहे. सनदी वकीलीची परिक्षा व बार-अॅट-लॉचा अभ्यासक्रम घेणारांस भाषाविषय आवश्यक असून मेडीकल स्कूल, गणीतविषय, लष्करी कॉलेज कोर्स, इत्यादि घेऊ इच्छिणारांस सायन्स शाखा आवश्यक आहे. - शिक्षणप्रसाराची तुलनाः-१९१०-१९११ सालच्या मानाने पाहिल्यास पूर्वीच्या २७० मुलांऐवजी १९२० त तीनही लिसेव मिळून ९४२ मुले शिक्षण घेतात व हीच तुलना १९२७-१९२८ सालाशी केली तर एकंदर ८६५ मुले शिक्षण घेत आहेत.