पान:गोमंतक परिचय.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय वास्को ते दोना पालच्या खेपा घालून संध्याकाळी मेलीचे टपाल घ्यायला मुरगांवीं येते. व ते घेऊन रात्रौ पणजीस पोंचते. मुरगांव ते दोना पाव्ल अपर १४ आणे व लोअर ५ आणे व मुरगांव ते पणजी अनुक्रमें १ रु. १० आणे व ५ आणे असें भाडे पडतें. खुष्कीचे रस्तेः-ह्या रस्त्यांचे तीन प्रकार आहेत. काही रस्ते प्रांतीय महत्वाचे असे आहेत. ते सरकारने स्वतः बांधलेले आहेत. त्यांना राष्ट्रीय सडक (estrada nacional) असे संबोधण्यात येते. या सडका कोसेल्यांतून रहदारीसाठी म्युनिसिपालिट्यांनी बांधलेल्या आहेत. त्या म्युनिसिपल सडका व ग्राममंडळाकडून तयार झालेल्या सडका. सरकारी सडकांची लांबी ३७५ किलोमिटर म्हणजे २४१ मैल आहे व म्युनिसिपल सडकांची लांबी ५३३ किलोमिटर म्हणजे ३५० मैल आहे. असें सरकारी माहितीवरून समजतें. ( Portaria provincial no 594 de 27-XII-1928) खाली केवळ मोठ मोठ्या रस्त्यांचीच माहिती देत आहों. उभे रस्ते न्हइबाग ते वेरें व बेती ( पणजीस पोचण्यासाठी ) हा रस्ता ३१ किलोमिटर (२० मैल लांबीचा ) असून मध्ये पेडणे, धारगळ, कोळवाळ, कुचेली, म्हापसें, साळगांव ह्या स्थानांतून वेरें येथे पोचतो. पण पणजीस लवकर पोंचण्यासाठी याची लांबी म्हापसें ते बेती या फांट्यामुळे सुमारे २ मैलांनी कमी झालेली आहे. पणजीहून पोळे; ही सडक ८३॥ कि. मी. (५२ मै.) असून थोरले गोवें ( कदंबांचें) अधशी कुठाळ (श्री मंगेशाचे आद्यस्थान) वेणे (श्री म्हाळसे, आद्यस्थान) मडगांव कुंकळ्ळी. काणकोण, लोलये वरून माजाळ गांवांतील ब्रिटीश सडकेला मिळते. मध्ये अधशी नदीचे पात्र, तर्पण येथें तर्पणच्या नदीचे व लागलीच २ मैलांनी गाल्जीवागच्या नदीचे पात्र, अशी तीन पात्रे ओलांडावी लागतात. बाळ्ळीपासून काणकोण पर्यंत ह्या रस्त्यावर वनश्री फारच मनोहर लागते. विशेषतः करमळ घाटांत हा रस्ता वळणावळणांनी सुमारे २ मैल चढून उतरतो तो भाग सुंदर दिसतो. हे दोनही रस्ते जोडतांच पेडणे व पोळे हे गोमंतकाचे उत्तर दक्षिण बिंदु साधणारा उत्तर दक्षिण रस्ता बनतो. प्रमुख प्रमुख आडवे रस्तेः-हे सारे सह्याद्रीच्या घाटांत चढतात. किंवा इंग्रजी हद्दीत जातात. त्यांची माहिती खालील कोष्टकावरून होईल.