पान:गोमंतक परिचय.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण पहिले.. बसतात. मंगेशी, महाडदोळ, वेलिंग वगैरे देवालये पाहण्यास कुंडई वंदर उपयोगी पडते. पणजी ते कुंडई अपर १२ आणे व लोअर ५ आणे भाडे असून सांव. ते कुंडई १ रु. ४ आणे व ८ आणे आहे. २. दुसरी फेरी पणजी ते वळवईची. पणजीहून संध्याकाळी ४॥ च्या सुमारास निघून वळवईला ७॥ वाजतां पोंचते व पुनः दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता निघून १० वाजतां परत पणजीस पोंचते. ही फेरीहि दररोजची आहे. मध्ये रायबंदर, गोवें, करपीन, पिळगांव, सूर्ल ही बंदरें लागतात. भाडे अपर रु. १ व लोअर ८ आणे आहे. ३. तिसरी फेरी पणजी ते हळदोणची. रोज संध्याकाळी ४-४५ ला पणजीहून निघून बिछोण, वंडो, एकोशी, पोंबु, आमाडी व कालवे ही बंदरें करून ६-३० ला दळदोणेस पोंचते, व रात्रौ तेथें नांगर टाकून दुसऱ्या दिवशी सकाळची ७-३० ला हळदोणेहून निघून वरील बंदरें करीत ९ ला पणजीस परत पोंचते.. यांतील वंडो, आमाडी व कालवे ही अनियमित बंदरें होत. __पूर्वी या लाइनच्या बोटी पणजीहून दिवसा दोनदा फेऱ्या करीत असत, पण गेल्या २ वर्षांपासून या २ खेपा वाहतुकीच्या मानाने जरा खर्चाच्या होत असल्याने, एकच फेरी ठेवली. मात्र या वेळाप्रमाणे सदरहू लाइनीच्या प्यासेंज-- र्सनां (जे कोणी बोटीने मुंबईस जात असतात ) मुंबईची बोट गांठतां येऊं लागली. पणजी ते हळदोणचे भाडे अपरक्लास ८ आणे व लोअर क्लास ४॥ आणे आहे. ४. चौथी फेरी मांडवीच्या तरीची होय. हिला, बेती वेरेंची फेरी म्हणतात. हिला सकाळी ६॥ वाजतां सुरुवात होऊन तासा तासाच्या अंतराने साऱ्या दिवसभर तिच्या येरझारा चालू असतात. मध्ये १२॥ ते १॥ पर्यंत एक फेरी बंद असते. रात्रौ शेवटची फेरी ७॥ साडेसातांना होऊन ही बंद होते. ५. पांचवी फेरी मुरगांव व पणजी दरम्यानची. पहाटे पांच वाजतां पणजीहन निघून मध्ये वेरें बंदर व दोनापान्लाचे बंदर करून ७ वाजता मुरगांव बंदरावर मेलट्रेनला टपाल देऊन वास्को बंदर करते. पुढे थोड्याच वेळांत वास्कोहून निघून दोना पाल बंदर करून पुनः मुरगांवी दहा वाजतां येणाऱ्या मिक्सचे उतारू घेऊन उलट दोनापाव्ल वेरें, वहिन पणजीस येते. तेथून परत निघून सकाळच्या प्रमाणेच बंदरें करीत मुरगांवाहून निघणाऱ्या मिक्स गाडीला उतारू घेऊन जाते. परतः