पान:गोमंतक परिचय.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ६३ यव, ज्ञानतंतुसमूह व ज्ञानेंद्रियें, फिझियॉलॉजी, पचनक्रिया, रुधिराभिसरण, श्वसनक्रिया, त्वचेचे व्यापार, प्राणीज उष्णता व तिचे व्यापार, प्राण्यांची उत्पत्ती, प्रमुख प्रमुख प्राणीज पदार्थ, संपूर्ण वनस्पतिशास्त्र; पृथ्वीच्या घटनेचे निरनिराळे थर ओळखण्याइतकें खनिजशास्त्र व भूगर्भशास्त्र. ८गणीत विद्याः-वेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार; बिजगणिताचे अपूर्णांक, साधीं समीकरणे, दिझीग्वालिदाद द प्रिमर ग्राव, रादिकाइश, अपूर्णघाताचे वर्ग, लॉगारीत्मुश, श्रेढी, कोंबिनासांव, बिनोमियु द न्यूटन, वर्ग समीकरणे, चतुर्घात समीकरणें, संयुक्त समीकरणे, साधी भूमिति, घनभूमिति. चित्रकलाः--आर्किटेक्चरचे निरनिराळे प्रकार व त्यांची ओळख घेण्यापुरतें रेषाचित्रकलेचे ज्ञान. वास्तुशास्त्राचा इतिहास, इजीप्शन, ग्रीक, रोमन, बिझांतीन, आरबी, आजीव्हाल, रेनासेंस व मॉडर्न या स्टाइल्सची ओळख ( हिंदी, मोगल, चिनी व जपानी या कलांचा मागमूसही नाहीं ! ) परस्पेक्टिव्ह व त्याचे नियम, ऑर्नामेंटल चित्रांचे मेमरी ड्राइंग व कॉपी. कूर्स कोंप्लेमेतार द लेत्रशः-(भाषा विषयांची ६ वी व ७ वी इयत्ता) १पोर्तुगीज भाषा:--पोर्तुगीज वांग्मयाची प्रत्यक्ष ग्रंथाच्या द्वारें ओळख, त्यावर झालेला अगदी अर्वाचीन टीका; बाह्य वांग्मयाचा पोतुगीज वांग्मयावर झालेले परिणाम; ग्रीक व रोमन वांग्मयाची माहिती; शब्दपरिच्छेद, वाक्यपरिच्छेद व वाक्यमीमांसा, वांग्मयाच्या इतिहासावर निबंध व टीका; पोर्तुगीज व्याकरणाची ऐतिहासिक स्थित्यंतरें; ल्याटिन भाषेतून पोर्तुगीज शब्दनिर्मिति व व्युत्पत्तिशास्त्र. २ल्याटिन भाषा:--सीझरचें चरित्र, सिसरोची आमीसिया व व्याख्याने, व्हर्जील, ओव्हिदियुची मेतामोफोझिश, आरासियु, यांचे वाचन व भाषांतर; वाक्यरचना व वाक्यपदच्छेदापर्यंत व्याकरण; वृत्तदर्पणाची माहिती; आणि ल्याटिन वाङ्मयाचा संक्षिप्त इतिहास. ३ फ्रेंच भाषा:–वृत्तपत्रे व नियतकालिके यांचे वाचन, आजकालच्या प्रसिद्ध ग्रंथकारांच्या ग्रंथावर संभाषण, फ्रेंचं भाषेच्या उत्क्रांतीचे ग्रंथाच्या वाचनावरून ज्ञान, मुख्य मुख्य वांग्मय प्रचारांचे वर्णन, काव्यशास्त्राची माहिती, इ. ४ इंग्रजी भाषाः-इंग्रजी लेखकांचे ग्रंथ वाचणे, भाषांतर, इंग्रजी वाङ्मयाचा इतिहास, निबंधलेखन, धड्यांचा सारांश लिहिणे, इंग्रजी भाषेचा संक्षिप्त इतिहास; काव्याची माहिती व साधित शब्दविचारापर्यंत व्याकरण.