पान:गोमंतक परिचय.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय त्याची प्रमाणे; ऋतु व दिनमान, चंद्राची गति, ग्रहणे, अक्षांश रेखांशाची माहिती, हवामानांतील फेरफारांची माहिती व त्याची कारणे; प्राणी व वनस्पती यांची पृथ्वीवरील वांटणी व तिचा कटिबंधादि उपाधीशी संबंध; प्रमुख खनिज पदार्थ व उपयुक्त वनस्पतींशी ओळख; जगांतील मुख्य उत्पादक शहरांची, मोठमोठ्या जलस्थल व आकाशमार्गाची माहिती, त्यांचा भूगोलविद्येशी संबंध, मानवी वंशांचा परिचय, त्यांची जगावर वाटणी व तिची कारणे, मानवी प्रयत्नांनी जगांत घडवून आणलेले फेरफार; महासागर व खंडे यांची वाटणी आणि आद्यकालापासून होत आलेली त्यांतील स्थित्यंतरें; नद्या, डोंगर याची जगांतील वाटणी व तिचे परिणाम, महासागरांतून दिसून येणारे हिमनग, अंतःप्रवाह, भरती आहोटी इत्यादि माहिती. ५ सृष्टिशास्त्र--मानवी शरीराची माहिती; आणि प्राणीशास्त्रांतील सपृष्टवंशी व अपृष्टवंशी यांचे वर्ग; सपुष्प वनस्पतींचे संपूर्ण ज्ञान, अपुष्प वनस्पति व त्यांतील वर्ग, दोहोंची तुलना, एकदल व द्विदल वनस्पति व त्यांचा उपयोग. ६ गणीत विद्याः-चार साधी कृत्ये, व्यवहारी अपूर्णांक, विविध व दशांश अपूर्णांकांतील कृत्ये, घात प्रकरण व वर्गमूळ, प्रमाणगणीत, त्रैराशिक, पंचराशिक, व्याज, डिस्काउंट, नफा तोटा, सर्कत वांटणी, इत्यादि, भमितीच्या व्याख्या, वर्तुळा"पर्यंत क्षेत्रफळ व गोलापर्यंतचे घनफळ. चित्रकलाः- रेषा चित्रकला व विशेषकरून भूमितींतील सारे घन यांची चित्रे. सेगूंद सेक्सांवः-(तिसरी, चौथी व पांचवी इयत्ता) १ पोर्तुगीज भाषाः--१६ ते १९ व्या शतकांतील ग्रंथकारांचे वाचन, महाकाव्य लुझीयदश, वाक्यमिमांसा, शब्दयोगी अव्ययांचा उपयोग, संपूर्ण साधित शब्दविचार, वृत्तदर्पणाचा अभ्यास, निबंधलेखन, स्थलवर्णन आणि पोर्तुगीज वाङ्मयाचा इतिहास. २ ल्याटिन भाषाः-वाचनाचे नियम, विभक्ति प्रत्यय, क्रियापदें चालविणे, शब्दयोगी व क्रियाविशेषण अव्ययें, भाषांतर व पोर्तुगीज वाक्यांचे ल्याटिन रूपांतर, उपसर्ग व प्रत्ययांच्या द्वारें साधित शब्दविचार व अव्ययांचा पूर्ण विचार.. ३ फ्रेंच भाषाः-शाळेतील जीवनक्रम, घरांतील जीवनक्रम, व्यायाम व खेळ, शहरें, स्मारके, शेती, डोंगर, जंगल, समुद्र इ. विषयांवर संभाषणे, आधुनिक फ्रेंच ग्रंथकारांच्या एक दोन ग्रंथाचे वाचन, भाषांतर, पोर्तुगीज लेखाचें फ्रेंच भाषेत रूपांतर, फ्रेंच वाङ्मयाची संक्षिप्त रूपरेषा, फ्रेंच व्याकरणाचा अभ्यास.