पान:गोमंतक परिचय.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें. रिपब्लिकन युगः-रिपब्लिकच्या अमदानीत इतर शैक्षणिक विभागांत जसे फेरफार झाले तसेच ते दुय्यम शिक्षणांतही झाले. लिसेवाचे शिक्षण देणाऱ्या लिसेव मुनिसिपाल' नावाच्या आणखी दोन शाळा, अनुक्रमें मडगांव व म्हापशे येथे स्थापन झाल्या. त्यांतून लिसेवच्या इ. स. १९०५ च्या सुधारणामुळे झालेला जनरल कोर्सचा पहिला विभाग पूर्ण होऊ लागल्याने पुष्कळच विद्यार्थ्यांची सोय झाली. लिसेव संत्रालची स्थापनाः--इसवी सन १९१९ साली सरकारने पणजीच्या लिसेवाची वाढ करून त्याला लिसेव संत्रालचा दर्जा दिला. अभ्यासक्रमांत. झालेल्या वाढीमुळे आज जवळ जवळ वीस बावीस वर्षेपर्यंत झालेल्या पिच्छेहाटीने, मेडिकल कोर्स घेणाऱ्या किंवा इतर वरिष्ठ अभ्यासास जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी अपुरी होऊन त्यांची जी कुचंबणा होत होती, तिची विल्हेवाट लागून इतक्या वर्षांची प्रजेची गरज पुरी झाली. त्यावेळचा अभ्यासक्रम अजूनही चालत असल्यामुळे, या अभ्यासक्रमाच्या इयत्तावार वांटणीची माहिती होतांच ब्रिटीश अभ्यासक्रमाशी त्याची तुलनेने लिसेवोर्णि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे माप महाराष्ट्रीयांस समजणे सुलभ होणार असल्याने आम्ही तो सविस्तर खाली देत आहों. प्रिमर सेक्सांवः-(पहिली व दुसरी इयत्ता ) १पोतुगीज भाषाः-वाचन, शुद्धलेखन व धड्यांचा तोंडी व लेखी सारांश देणे, कवितांचा अर्थ गद्यांत लिहिणे, शब्दविचार पुरा, उपसर्ग व प्रत्यय, साधित शब्दांची रचना, शब्दयोगी अव्ययाची कारकें, वाक्यपरिच्छेद आणि प्रसिद्ध ग्रंथकाराच्या निवडक ग्रंथांचे वाचन.. २ फ्रेंच भाषाः-शाळा, मानवी शरीर, काळ व त्याचे विभाग, कुटुंब, पोषाख, घर, त्याची बांधणी व विभाग, आहार, इत्यादि परिचित विषयांवर तुटक वाक्यांनी संभाषण; लहान लहान धड्यांचे भाषांतर; वाक्ये तयार करून छोटे छोटे सारांश लिहिणे; तेवढ्याच पुरता शब्दविचार व वाक्यरचना. ३ इंग्लिश भाषाः-डायरेक्ट मेथडनें शब्दज्ञान, शाळा, शरीर, काळ, कुटुंब, आहार, इत्यादि विषयांवर साधी संभाषणे व लहान लहान वाक्यांनी शिकलेल्या धड्यांचा आशय सांगणे, वाक्यांचे रूपांतर इ. भूगोलज्ञानः-प्रत्यक्ष परिचयाने व्याख्यांची समजूत; दोन ठिकाणांतील रस्ता निश्चित करणे; हवेतील फेरफार, नकाशांचे वाचन, खगोलस्थ ज्योतींची वर्गवारी; मुख्य मुख्य तारकापुंजांची ओळख, ध्रुवताऱ्यावरून दिशाज्ञान, पृथ्वीचा गोलाकार व