पान:गोमंतक परिचय.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय अवधींत होतो. ह्याशिवाय गोव्याहून जातांना प्रत्येक तिकिटीमागे दहा आणे सरकारी कर तिकिटीच्या दरांतच आकारला जातो. जलमार्गाच्या सोयींत मुंबई ते मुरगांववरून दक्षिणेस मंगलोर पर्यंत आठवड्यांत दुबार जाणारी आगवोट सव्हिस व दुसरी मुंबई ते पणजीपर्यंत फेरी करणारी सर्व्हिस अशा दोन सोई किलीक निक्सन कंपनीच्या बोटीमुळे व "माझी आगबोट कंपनी "ची गोवालाईनची सहिस तिसरी सोय आहे. यांतून हा प्रवास सुमारे १८ ते २० तासांत होतो. मुरगांव व पणजी येथे आगबोट धक्यास लागत असल्याने चढ उतारांतही पडावांचा त्रास नसतो. पावसाळ्यांत यांपैकी केवळ मुंबई मंगळूर लाइनचीच बोट आठवड्यास एकदां फेरी करते. गोव्यांतून निघतांना तिकिटीशिवाय दहा आण्याचा सरकारी कराचा पास निराळा घ्यावा लागतो. ___ बाह्य प्रदेशांशी दळणवळणाची सोय ह्या कंपनीकडून होते. तशी अंतर्गत सोयीसाठी सरकारने स्वतः चालविलेली " नाव्हेगासांव फ्लव्हियाल'ची सोय आहे. हे खातें नाविक खात्याचे पोटखातें म्हणून काम करते. त्याच्या लहान लहान अशा आठ स्टीम बोटी आहेत. ह्या बोटींकडून खालील फेऱ्या करण्यांत येत असतात. १. पणजी ते सांव. ऊर्फ सासष्टीची फेरी. पणजी येथून सकाळी ११ ला निघून, मध्ये रायबंदर, जुनें गोंवें, कुंभारजुवें, कुंडई, डोंगरी, मडकई, उंडीर, दुर्भाट, बोरी, रायतूर, माणकें व सावर्डे ही बंदरें करते. सांवर्डे येथे संध्याकाळचे पांच वाजण्याच्या सुमारास पोंचून दुसऱ्या दिवशी मिक्स ट्रेनच्या सांव. स्टेशनावरील आगमनानंतर अर्ध्यातासाने (सुमारे ८ वाजतां) निघून तीच बंदरें करून २-२॥ च्या सुमारास पणजीस पोंचते, मात्र दर पंधरवड्यास १० मी ११ शी १२ शीच्या सुमारास तीन दिवस पणजीहून ९ वाजतां निघून सावर्डे येथे २ वाजतां पोंचते व सांवडेंहून ७ वाजतां निघून पणजीला १२ च्या सुमारास पोंचते, ह्या फेरी दररोजच्या असून भाडे पणजी ते सांव. अपर क्लास २॥ रुपये व लोअर क्लास बारा आणे आहे. शिवाय सामानाचे भाडे निराळे द्यावे लागते. दुर्भाट बंदर हे फोंडे व कवळे, बांदिवडें, इत्यादि ठिकाणी देवदर्शनास जाण्यास सोयीचे आहे. पणजीहून दुर्भाट अपर १ रु. ८ आणे व लोअर ८ आणे असें भाडे आहे. सांव. येथून हे दर रु. १ व ५ आणे असे