पान:गोमंतक परिचय.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें. - गणीतविषय, भूमिति व बिजगणीत याचे शिक्षण पूर्ववत्च आकादेमीय मिलितारमध्ये मिळत होते. पदार्थविज्ञान व रसायनशास्त्र यांच्या शिक्षणाची सोय, १८४५ साली प्राथमिक शाळांतून करण्यांत आली होती. परंतु गोमंतकांतील वैद्यक पाठशाळा व लष्करी शाळा या दोनच वरिष्ट शिक्षणांच्या संस्थांत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याच्या सोयीसाठी, इ स. १८५३ त ते विषय शिकविण्याची सोय आकादेमीय मध्येच करण्यांत आली. पुढे इ. स. १८६७ त पदार्थविज्ञान व रसायनशास्त्र यांच्या अभ्यासक्रम मेडिकल स्कूलला जोडण्यांत येऊन १८९२ त लिसेवच्या झालेल्या पुनर्घटनेत कायमचाच लिसेवला जोडला गेला. __ ह्या शिवाय १८९४ साली मडगांव व म्हापशे येथे ल्याटिनच्या शाळा उघडण्यांत आल्या व बारदेशचे लोक इंग्रजी हिंदुस्थानांत बरेच जाऊं लागल्याने, त्यांच्या सोयीसाठी म्हापशे येथे एक इंग्रजीची शाळाही उडघण्यांत आली. १८५५ त म्हापशेच्या फ्रेंच शाळेची स्थापना झाली व १८६९ त मडगांव येथे इंग्रजीची शाळा सुरू करण्यांत आली. ही सारी व्यवस्था विस्कळीतच होती. कारण विद्यार्थ्यांच्या मानसिक वाढीप्रमाणे शिक्षणाचा अनुक्रम या व्यवस्थेत मुळीच नसून झेंपतील तेवढे विषय घेऊन क्रमाक्रमानेच सारा अभ्यासक्रम त्यांना पुरा करावा लागत असे. मात्र तत्वज्ञानाचा कोर्स घेणारांनां ल्याटिनचा अभ्यासक्रम अगोदर पुरा करावा लागे व ल्याटिनचा कोर्स घेणारानां पोर्तुगीज व ल्याटिन व्याकरण अगोदर शिकावे लागत असे. कोमिसार्य सुपेरियोर दज् लेत्रश् ( डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन् ) यांची शाळेचे रैतोर ( हेडमास्तर) या नात्याने दुय्यम शिक्षणावर देखरेख चालत असे. कोमिसायुच्या गैरहजीरीत लिसेवच्या एखाद्या शिक्षकाचीच नेमणूक रैतोरच्या जागी गव्हर्नरकडून होत असे. इ. स. १८६९ त लिसेवचा शिक्षणक्रम विशेष व्यवस्थित होऊन सर्व विषय लिसे. वांतच शिकण्याची सोय झाली. अभ्यासक्रमांतही बराच बदल झाला होता. १ पोर्तुगीज भाषा व वाङ्मय; २ फ्रेंच; ३ इंग्लिश; ४ ल्याटिन् ; ५ अंकगणीत, बिजगणीत, भमिति (प्लेन व सॉलिड) व त्रिकोणमिति; ६ पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र व सृष्टशास्त्र यांची मूलतत्वे; ७ भूगोल व इतिहास; ८ तत्वज्ञानप्रवेश; ९ रेषाचित्रकला. इतक्या विषयांचा अभ्यासक्रम तीन कोसातून वांटून दिला होता. पहिला सामान्य कोर्स हा चार वर्षांत पुरा करतां येई; हा पुरा होतांच भाषाविषय (Curso de letras ) किंवा शास्त्रीय विषय ( Curso de sciencias) यांपैकी मर्जीप्रमाणे वाटेल तो घ्यावयाचा असे. भाषाविषयाच्या अभ्यासास १ वर्ष पुरत असे