पान:गोमंतक परिचय.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय - वर सांगितलेल्या “आकादेमीय मिलितार” ची पुनर्घटना करून तिला त्यांनी इश्कोल मातेमातिक इ मिलितार असें नांव दिले. त्यामुळे तींत १ गणीत, बीजगणीत,. भूमिति, त्रिकोणमिति व चित्रकला; २ पदार्थविज्ञान शास्त्र व रसायनशास्त्र; ३ भूगोल व इतिहास; ४ इंग्लिश; व ५ फ्रेंच भाषा इतक्या विषयांचा समावेश केला गेला. परंतु १८४२ तच लोपिज द लीम यांनां मिलिटरी क्रांतीमुळे अधिकारत्याग करावा लागल्याने, मागून आलेले गव्हर्नर कोंदि द आंतशू यांनी १८४२ तच ही सारी सुधारणा बंद ठेविली. तरी देखील लोपिज द लीम यांनी उघडलेल्या स्कुलांपैकीं, ल्याटीन, तर्कशास्त्र व अलंकारशास्त्र यांचा अभ्यासक्रम असलेली तीन स्कुलें; फ्रेंच व इंग्रजीची स्कुले व पोर्तुगीज भाषा, गणीत, भूगोलेतिहास व कालमापन इतका अभ्यासक्रम असलेली पांच स्कुले कायम राहिलींच. इ. स. १८५० त पणजी येथे दुसरा एक कोर्स उघडला गेला व त्यांत तत्वज्ञान, वक्तृत्वकला, काव्यशास्त्र व पोर्तुगीज वाङ्मय इतके विषय शिकविले जाऊं लागले. त्याचप्रमाणे मडगांव येथें फ्रेंच भाषेची शाळा उघडण्यात आली. सारांश इतक्या अवधीत दुय्यम शिक्षणाची सोय म्हणजे इंग्रजी, फ्रेंच, ल्याटिन, तत्वज्ञान, गणीत, भूमिति आणि चित्रकला यांचें तुटक व विस्कळित शिक्षण द्यावयाच्या स्वतंत्र शाळांतून जी होत होती तेवढीच असे. दुय्यम शिक्षणाची स्वतंत्र व्यवस्थाः-इ. स. १८५४ साली व्हिश्कोंदि द और या गव्हर्नरनी दुय्यम शिक्षणाची सोय पद्धतशीरपणे केली. दुय्यम शिक्षणाच्या शाळांनां पोर्तुगीज भाषेत लिसेव हे नांव आहे. लिसेव सेंत्राल, लिसेव नासियोनाल व व लिसेव मुनिसिपाल असे त्याचे तीन प्रकार आहेत. उपरोक्त गव्हर्नरने गोव्यांत. लिसेव नासियोनालची स्थापना केली. त्यांत पुढील अभ्यासक्रम येत होता. १ पोर्तुगीज भाषा व ल्याटिन भाषा (तीन वर्षे ) २ तत्वज्ञान, नीतितत्वे, नैसर्गिक कायदा, वक्तृत्वकला व काव्यशास्त्र, प्राचीन वांङ्मय, विशेषतः प्राचीन पोर्तुगीज वाङ्मय ( दोन वर्षे ) ३ जगाचा भूगोलेतिहास, कालमापन व स्ट्याटिक्स ( दोन वर्षे ) ४ फ्रेंच भाषा (२ वर्षे ) ५ इंग्लिश (२ वर्षे ) ६ मराठी माषा ( १ वर्ष)