पान:गोमंतक परिचय.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें. ष्टीतील ) व म्हापशे आणि कांदोळी (बारदेशांतील) अशा पांच शाळा स्थापन केल्या. राजधानींतील शिक्षकांस सालिना ८०० असा व इतरत्र ६०० असा असें वेतन मिळत होते. इ. स. १८२३ त व्हायसरॉय दों मानुवेल दा कामर यांनी जो खलिता राजेसाहेबांनां लिहिला त्यांत, “ चोडण व रायतुरच्या सेमिनारीतून मुळींच शिक्षण मिळत नसून शिक्षकांचे ज्ञान देखील कच्चे आहे. केवळ तीस विद्यार्थ्यांपायी सरकारला दरसाल वीस हजार असपयांचा खर्च करावा लागतो. आणि हे तीस विद्यार्थी देखील केवळ धर्मोपदेशक होण्यासाठींच शिक्षण घेत असतात. सामान्य प्रजेची यांत सोय मुळीच नाही. तेव्हां सामान्य लोकांच्या शिक्षणासाठी एक स्वतंत्र संस्था काढल्यास प्रजेवर फारच उपकार होतील." असा मजकूर होता. परंतु सनदशीर राज्यपद्धतीची सुरुवात झालेली असली तरी पोर्तुगालांत अजूनही यादवी चालूच होती. त्यामुळे या खलित्याचा विचार मात्र झाला नाही. इ स. १८२९ त व्हायसरॉय दों मानुवेल द पोर्तुगाल इ कात्रु याने हीच स्थिति पोर्तुगालांत पुनः कळविली व चोडणची सेमिनार्यु धर्मशिक्षणास राखून रायतुरची सेमिनार्यु इतर वर्गाच्या शिक्षणासाठी घ्यावी आणि तिच्यावर विशपचा अधिकार मुळीच चालू नये असे सुचविले. परंतु ही सूचनाही अरण्यरुदनवत् ठरली. मुळच्या ज्या पांच ल्याटिनच्या शाळा होत्या, त्यांपकी प्रत्येक महालाच्या राजधानीत एक एक अशा केवळ तीनच राहूं देऊन बाकीच्या दोन त्याने काढून टाकल्या. सनदशीर राज्यपद्धतींतः- इसवी सन १८३५ पासून १८४१ पर्यंतच्या अवधीत दुय्यम शिक्षणाविषयीं गोव्यांत मुळीच विचार होऊ शकला नव्हता. १८४१ त गव्हर्नर लोपिज द लीम यानी मिलिटरी आकादेमींत फ्रेंच व इंग्रजी शिकविण्याची सोय केली. व त्याच सालच्या आगष्ट महिन्यांत सासष्ट, बारदेश व तिसवाडी या कोमाकौतून तीन तीन शाळा स्थापन केल्या. पहिलींत ल्याटिन ग्रामर, तर्कशास्त्र व अलंकार शास्त्र; दुसरीत पोर्तुगीज व्याकरण, गणीत व रेषा चित्रकला; व तिसरीत पोर्तुगालचा व जगाचा भूगोल, इतिहास व कालमापन असे विषय शिकवीत. धार्मिक शिक्षणाचे बांडगूळ नसतानां याच शाळांतून दुय्यम शिक्षणाची सुरुवात सरकाराने केली या खेरीज पणजी शहरांत एक स्वतंत्र शाळा स्थापन करून तति जगाचा भूगोलतिहास, पोर्तुगालचा भूगोलेतिहास, कालमापन व स्टयाटिक्स इतके विषय शिकविण्याची स्वतंत्र सोय झाली होती.