पान:गोमंतक परिचय.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय 'रायतूरची सेमिनायु पुनः उघडून या उभय सेमिनायुना मदत द्यावी व गोवा शहरांतील बों जेजूसच्या कोव्हेंतांत एक नवी सेमिनायु उघडावी.' असा हुकूम इ. स. १७८१ त राणी मेरी पहिली इच्याकडून आला. ही नवी सेमिनायें नुकत्याच आलेल्या इटालियन पायांकडे सोपविण्यात आली. चोडणच्या सेमिनारीस पूर्वी ठरलेले ९०३८ असफ्यांचे वर्षासन मिळू लागले व राहिलेल्या सेमिनारीस प्रत्येकी ९००० असा वर्षासन देण्यांत आले. । इटालियन पाद्री सरकारची सत्ताही जुमानीत नसत, मग तिजोरीतून मिळणाऱ्या पैशाचा हिशेब देणे दूरच राहिले. अर्थात त्यांच्या हातून बों जेजूसची सेमिनायु काढून घेण्यांत आली व पुढे थोड्याच काळाने ती मुळांतच बंदही करून टाकण्यांत आली. राहिलेल्या उभय सेमिनारीतून (१) ल्याटीन भाषेचं शिक्षण [ अनियमित मुदतीचें ] (२) तत्वज्ञान व नीतितत्वे ( ३ ) थिऑलॉजीय दॉग्मातिक व थिऑलॉजीय मोराल असा तीन वर्षांचा अभ्यासक्रम होता. सुट्टीच्या दिवसांतून बायबल, धार्मिक गाणी व चर्चमधील उपासना चालविण्यास शिकवीत असत, उभय सेमिनारीस दहा दहा हजार असफ्यांची नेमणूक मिळत असे व ती जेसुइटांच्या जप्त केलेल्या उत्पन्नांतून देण्यांत येई. मार्केझ द पोंबालची योजनाः--इ. स. १७७२ मार्केझ द पोंबाल या मुत्सद्याने जेसुइटांची हकालपट्टी केल्यावर शिक्षणाची सूत्रे सरकारने आपल्या हाती घेतल्याचे आपण प्राथमिक शिक्षणाच्या स्थित्यंतरांत पाहिलेच आहे. व तत्वज्ञानाची एक, अलंकारशास्त्रची एक व ल्याटिन व्याकरणाची एक, अशा तीन शाळा दुय्यम शिक्षणाच्या सोईसाठी निर्माण केल्या गेल्या होत्या. या शाळांतील प्रोफेसरांनां अनुक्रमें ४६० हजार रैस, ४४० हजार रैस व ४०० रैस असें वार्षिक वेतन पूर्वोक्त शैक्षणिक करांतून मिळत असे. पुढे इ. स. १७७८ त सासष्ट व बारदेश प्रांतांतून प्रत्येकी एक ल्याटीनचा प्रोफेसर सालिना २०० हजार रैस देऊन ठेविला. ही परिस्थिति इ. स. १८०० पर्यंत चालू राहिली. त्या साली व्हैग काब्राल या गव्हर्नरने काटकसरीच्या सबबीखाली या एकंदर शाळा बंद केल्या. त्यांच्यामतें सासष्ट प्रांतांतील लोकांना रायतुरची सेमिनायु व तिसवाडी आणि बारदेश प्रांतांतील लोकांना चोडणची सेमिनायुं पुरेशी होती. त्यामुळे पुनः एकदां दुय्यम शिक्षण पाठ्यांच्याच हाती राहिले. इ. स. १८०८ त व्हायसरॉय कोंदि द साझेदार यांनी ही परिस्थिति लक्ष्यांत घेऊन ल्याटिन शिकविण्यासाठी जुने गोवे येथे एक, माजोर्डे, चिंचोणे (सास