पान:गोमंतक परिचय.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ५० . आगुश्तीन्यु आर्डरचे पाद्रींचा प्रवेश १५७२ त झाला व इ. स. १६२२ त कालजियु द पॉपुल नांवांचे त्यांचें कॉलेज तिसवाडीतील नेवरे येथे सुरु झाले. पण कॉलेजची जागा पाद्रींच्या कॉन्व्हेंटपासून बऱ्याच अंतरावर असल्यामुळे, आणि नेवरेंच्या हवापाण्याच्या तक्रारीमुळे, पणजी येथे भव्य इमारत उभारून तेथेच हे कॉलेज नेण्यांत आले. थिऑलॉजी, तत्वज्ञान व ल्याटिन हेच ज्ञान या कॉलेजांतही मिळत असे, इ. स. १७५९ त मार्केझ द पोंबालने जेसुइटांची कॉलेजें बंद केली व पोर्तुगालच्या राजकीय क्रांतीमुळे सनदशीर राज्यपद्धती सुरु होतांच, इ. स. १८३५ साली ह्या साऱ्या संस्था बंद करण्यांत येऊन शिक्षणाची सारी सूत्रे सरकारच्या हाती गेली. शिक्षणाचा दर्जा व परिणामः-" जेसुइट लोकांना वाईट शिक्षक म्हणणे म्हणजे सत्यापलापच होईल. सांतु इनासियु दा लॉयॉल या शिक्षणशास्त्र हे प्रोटेस्टंट मेलांच्टन (Melanchthon) पेक्षां मुळीच कमी नव्हते. त्यांच्या शिक्षकांनी युरोपभर नांव मिळविले होते." असे म्हणण्यांत येते. जर्मनीतील म्युनीचच्या युनिव्हर्सिटीचे प्रख्यात प्रोफेसर यांक यांचे तर असेंहि म्हणणे आहे की, इतर शाळांतून दोन दोन वर्षात होत नसलेली प्रगति जेसुइटांच्या शाळांत केवळ सहा महिन्यांच्या अवधीतच होई. परंतु आम्हाला हे ग्राह्य दिसत नाही. मानवी मनाचा अनियंत्रित विकास हेच शिक्षगाचे अंतीम कार्य होय. बुद्धि, भावना, अवलोकनशक्ति, धारणाशक्ति, इत्यादि मनोवृत्तींचा परस्परसंवादी विकास ज्या शिक्षणांत होत नसेल, तें शिक्षण या संज्ञेला मुळीच पात्र नाही. याच कसोटीने शिक्षक व शिक्षण मापले पाहिजेत. जेसुइटांच्या शिक्षणांत बुद्धीच्या विकासाला नियंत्रण घालण्यात येत असे, असे त्यांच्या Ratio Studiorum नांवाच्या शिक्षणग्रंथावरून दिसून येते. सदर ग्रंथांतील नियमांचा विचार केल्यास खालील गोष्टी प्रामुख्याने नजरेसमोर दिसतात. १ त्यांच्या शिक्षकवर्गात स्वतंत्र बुद्धीच्या कर्तबगार व्यक्तींना जागा नव्हती. २ त्यांचे तत्वज्ञान त्यांच्या देवविद्येच्या सेवेसाठीच उत्पन्न झाले होतें. ३ त्यांच्या विद्यालयांतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनां, कंपनीच्या मताविरुद्ध असलेल्या ग्रंथांचे वाचन निषिद्ध होते. ४ त्यांच्याविरुद्ध असलेल्या सत्याचे प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथकारांची निंदा व कंपनीच्या मताला दुजोरा देणाऱ्या असत्यवादी ग्रंथकारांची स्तुति ही जेसुइटांच्या शाळेत हमेश चालत असत. ५ कंपनीच्या अस्तित्वाला धोका आणणारी किंवा आणूं शकणारी सत्यें, कंपनीच्या शिक्षणसंस्थांतून प्रवेश करूं शकत नसत. मेकॉलेने त्यांच्या