पान:गोमंतक परिचय.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें. १५६९ त मुसलमानांनी सासष्ट प्रांतावर हल्ला केल्यावेळी ह्या कॉलेजचाही विध्वंस झाला. तेव्हां इ. स. १६०६ साली ते रायतुरच्या तटबंदीत बांधण्यात आले व इ. स. १६१० साली पाद्रीनीं तेथें वर्गही सुरू केले. याच इमारतींत तूर्त रायतुरची सेमिनार्यु आहे. त्यावेळी, उपरोक्त कॉलेजांत थिऑलॉजीचा कोर्स, कोंकणी भाषेची शाळा, पोर्तुगीज लेखन वाचन, नीतितत्वे आणि धर्मशिक्षण इतके शिक्षण मिळे. एक छापखानाही तेथे त्यांनी उभारला होता व त्याच छापखान्यांतून पाद्रि इश्तेव्हं यांचे ख्रिस्त पुराण १६५४ त छापले गेले होते. हा छापखाना १५५६ सुरू झाला. म्हणजे हिंदुस्थानांत छापण्याची कला याच छापखान्याच्या द्वारे सुरू झाली असे वाटते. बारदेश प्रांतांतः-बारदेश प्रांतांत जेसुइट गेले नाहीत. कारण अव्वल पोर्तुगीजशाहीतच तो प्रांत फ्रांसिश्कान पाव्यांनी व्यापला होता. १५१८ तच त्यांचे बस्तान गोव्यांत बसले व त्यांनी आपल्या कार्यक्षेत्राची जागा बारदेशांत निवडली. इ. स. १५५५ त मांडवी नदीच्या उजव्या किनाऱ्यावर, पणजीच्या समोरच रेइज्माग येथे त्यांनी आपले पहिले कॉलेज स्थापन केले. परंतु देवळांच्या जप्त केलेल्या उत्पन्नावर ब्रह्मार्पण सोडून, जेसुइटांनां जशी सरकारने सढळ हाताने मदत केली होती तशी यांना मिळाली नाही. आणि म्हणून बारदेशांतील देवळांचा नाश करून त्यांची उत्पन्नें आपल्याला दणारा एकादा दियोग रुद्रीगिश उत्पन्न न झाल्याबद्दल उपरोक्त साधूंनी दुःखाश्रु ढाळले आहेत. कॉलेजला जोडूनच अनाथ बालकांच्या शिक्षणासाठी सेमिनायु द सां जेनिमुश ही संस्था स्थापन केली होती. आणि नवागत ख्रिस्त्यांना लेखन वाचन शिकविण्यासाठी काझ द कातेकूमेनुश् नांवाची शाळाही त्यांनी काढली. परंतु जेसुइटांच्या शिक्षणासारखी लोकमान्यता व त्यांची संपन्नावस्था या कॉलेजला केव्हांच प्राप्त झाली नाही. तिसवाडीतील व्यवस्थाः—इ. स. १५४० साली दोमिनिकान गोव्यांत आले. व १५८५ त त्यांनी पणजी येथे सां तोमाझचें कॉलेज नावाचे एक शिक्षणालय उघडले. पणजीच्या चर्चजवळच ह्या कॉलेजची इमारत होती. तेथे सापांचा उपद्रव फार होऊ लागला व वारंवार येणाऱ्या पुरांमुळे हे कॉलेज पुढे १६२२ त रायबंदर जवळच पानवेल येथे नेण्यात आले. इ. स. १५९९ त त्यांना, पोर्तुगीज दारूची ४ पि. आठ बुधले ऑलिव्हचे तेल, १: खंडी गहुं, २० खंडी तांदुळ, २० कोर्जी ( २० गठ्यांची एक कोर्ज ) म्हणजे ४०० सुती कपड्याचे गढ़े, एवढे सामान सरकारांतून मिळत असल्याचा दाखला मिळतो. पुढे हा क्रम बंद करण्यांत येऊन ह्या साऱ्या सामानाबद्दल नक्त १२०० असपर्याची ( ६०० रु.) नेमणूकच त्यांना मिळू लागली.