पान:गोमंतक परिचय.pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ४८ म्हणजे ' सर्वांसाठी सर्व करून ' संपूर्ण लोकसमूह आपल्या कबजांत घ्यावयालाच अवतीर्ण झाले होते. ग्रीक व रोमन ज्ञानाच्या पुनरुज्जीवनाची जी लाट सतराव्या शतकांत उत्पन्न झाली होती, तिच्याशी स्पर्धा करण्यासाठी जेसुइटांनीही आपल्या शिक्षण संस्था उत्पन्न केल्या. वर सांगितलेली सेमिनार्यु स्थापन होतांच कांही महिन्यांनंतर फ्रान्सिस झेवियर हा अत्यंत कर्तबगार जेसुइट पाद्री गोव्यांत आला. पाद्रि बोर्ब व व्हास हे दिवंगत होतांच या फ्रान्सिस झेवियरने त्यांची सेमिनार्यु कंपनीच्या नांवे आपल्या ताव्यांत घेतली. गव्हर्नरनेही या फेरबदलास संमति दिली. कंपनीसाठी एक व सां पाब्लच्या कॉलेजसाठी एक, अशा दोन इमारतीहि लागलीच बांधल्या गेल्या. कालेजांतून धर्माध्यक्षांच्या शिक्षणाची सोय केली होती. पुढे राजे दोजुवांव ३ रे याच्या हुकुमावरून तेथें, ल्याटिन, तत्त्वज्ञान व नीतितत्त्वे यांचे शिक्षण मिळू लागले. काही काळाने थिऑलॉजीहि ( ईश्वरविषयक ज्ञान ) शिकविण्यांत येऊ लागली. उत्तरोत्तर हे कालेज इतके वाढले की, त्याच्या पुढें सेमिनार्यु फिकी पडली. या सां पाब्लच्या कॉलेजांत आलेला छापखाना हाच गोमांतकांत स्थापन झालेला पहिला होय. दुय्यम शिक्षणाची व्यवस्था सारे अठरावें शतकपर्यन्त याच प्रकारे चालली होती. सतराव्या शतकाच्या पहिल्या दशकांत ( Pyrard Laval ) पीरार्द लाव्हाल हा प्रख्यात् फ्रेंच प्रवासी गोमंतकांत पोंचला होता. त्या वेळी या कॉलेजांत त्याने तीन हजारांपेक्षाही जास्त विद्यार्थी पाहिले होते. पण पुढे थोड्याच काळाने ही संपन्न स्थिति जाऊन कॉलेज डबघाईस आले व जुन्या गोव्यांत माजलेल्या सांथीचा धक्का त्याला बाधन गोवें शहरांतील रोझार्यु नांवाच्या टेकडीवर त्याची बदली झाल्यामुळे यापुढे कॉलेजला सां पाब्लु नोव्हु हे नांव मिळाले. या बदलीमुळे नंतर सुमारे तीस वर्षेपर्यन्त जेसुइट व आगुश्तीन्यपंथीय पाद्रींच्या कटकटी चालल्या होत्या. सासष्ट प्रांतांतील योजनाः-इ. स. १५६० त जेसुइटांनी सासष्ट प्रांतांत प्रवेश केला व रायतरचा प्रसिद्ध किल्लेदार बहाद्दर दियोग रुद्रीग याच्या शतकृत्यांबद्दल देवळाचें में उत्पन्न इ. स. १५७२ त त्याच्या विधवेला मिळाले होते, त्याचे दानपत्र जेसुइटांनी आपल्या कंपनीच्या नावे करून घेतले. दानपत्राचा कायदेशीरपणा सिद्ध होतांच १५७४ साली त्यांनी या इस्टेटी ताब्यात घेऊन मडगांव येथे आपलें कॉलेज स्थापन केले. इ. स.