पान:गोमंतक परिचय.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- प्रकरण सहावें . .. विभाग दुसरा दुय्यम शिक्षणाची व्यवस्था. अव्वल पोर्तुगीज अंमलांतः-पोर्तुगीजांच्या आगमनकाळी प्राथमिक शिक्षणाप्रमाणेच दुय्यम शिक्षणदेखील त्यांनी धर्माध्यक्षांच्याच ताब्यात दिले होते. त्यास अनुसरून इ. स. १५४१ त पाद्रि बोर्ब व ख्रिस्तीतरांच्या छळांत प्रामुख्याने भाग घेणारा पाद्रि मिगेल व्हास या उभयतांनी “कानडी, ' उत्तरेतील दक्षिणी' (1), मलबारी, सिंहली, बंगाली, पेग, मलायी, जावानीज, चिनी, हबशी, इत्यादि लोकांच्या मुलांना साक्षर बनवून सुसंस्कृत करण्यासाठी " सेमिनायु द सांत फॅ नांवाची शिक्षण संस्था उभारली. तींतून निघालेल्या विद्यार्थ्यांनी पढें 'आपापल्या देशांत जाऊन देशबांधवांत ख्रिस्ती पवित्रशास्राचा प्रसार करावयाचा',हेतु ही सेमिनार्यु स्थापन करण्यांत प्रमुख होता. म्हणजे ही शाळा केवळ मिशनरी व धर्मप्रसारक तयार करण्यासाठीच उत्पन्न झाली होती. या शाळेच्या स्थापनेनंतर दोनच महिन्यांनी त्या वेळचे व्हॅदोर दा फाझेंद, काइतेल ब्रांकु हे अॅक्टिग गव्हर्नरच्या जागी असतांना, तिसवाडीतील भन्न देवालयांच्या उत्पन्नाच्या हिशेबी, मागें जुलुमाच्या जंत्रीत सांगितल्याप्रमाणे ७६८ असोचा कर ग्रामसंस्थांवर बसविला व तो या शाळेला बहाल केला. युरोपांत लॉयाला याने जेसुइट कंपनी याच वेळी स्थापन केली होती. ल्य थरने उत्पन्न केलेल्या धर्मक्रांतीचे उच्चाटण करणे, हाच या कंपनीचा हेत होता, ही गोष्ट इतिहासांत प्रसिद्धच आहे. जेसुइटांचे शिक्षण म्हणजे क्यालिक केंद्रानसारी होतें. क्याथॉलिक धर्मतत्त्वांना ज्या शिक्षणाने वाधा येईल ते, ज्ञान या संज्ञेला पात्रच नहन्तें हेच त्यांचे मुख्य तत्त्व होते. त्यांची धर्मप्रसाराची साधने इतकी व्यापक होती की, त्यांतून बाल, तरुण, किंवा वृद्ध यांपैकी कोणताच वर्ग सटला नव्हताः कातेकीश्त ( धर्माना शिक्षक ) बनून ते..लहान मुलांना प्रार्थना वगैरें शिकवीत; मोठ्या माणसांसाठी त्यांनी व्यासपीठांचा आधार घेतला होता; आबालवृद्ध, रोगी, तरुण इत्यादि सर्व समाजासाठी कोंफेसियोनायु ( पातकोच्चाराची जागा ) तर त्यांच्याच हातीं होती; बेवारसी अर्भकांसाठी अनाथ बालकाश्रम, प्रतीत स्त्रियांसाठी वनिताश्रम, इत्यादि संस्था स्थापन करून हे जेसुईट लोक