पान:गोमंतक परिचय.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ४६ ७९९४. ख्रिस्ती; १०२९ हिंदु ९३ मुसलमान होते. ह्या नंबरांकडे पाहातां, हिंदु मुलांची संख्या पोर्तुगीज- शाळांतून बरीच कमी दिसते. हिंदूंतील अभिजातवर्ग खेरीज केल्यास इतर समाज या शिक्षणाकडे वळलेला नाही. कारण त्याला पुढील शिक्षण मिळवावयाचे नसतें व व्यवहारोपयोगी कामांत मराठी शिक्षणाने विशेष मदत मिळते. परंतु याखेरीज दुसरें कारण असे आहे की, हिंदुवस्तीच्या नवीन काबिजादीत पोर्तुगीज शाळांची व शिक्षकांची संख्या अगदीच तुटपुंजी आहे. च याची जबाबदारी सरकारवरच येते. नव्या काबिजादींतील १९१२०७ लोकसंख्ये करितां पोर्तुगीज शाळा केवळ - २० च असून त्यांतून २२ शिक्षक काम करीत होते. म्हणजे दर ८६९१, लोकांना एक शिक्षक वांटणीस येतो. आणि क्षेत्रफळाच्या मानाने पाहिल्यास २६८६ चौरस किलोमीटर जागेतून हे २२ शिक्षक काम करीत असल्याने, दर १२२ चौरस किलोमीटर ( ४७ चौ. मै.) नां एक शिक्षक पडतो. - पण हीच जुन्या काविजादींची स्थिति पाहिल्यास, २७८२८७ लोकांना १३० शिक्षक शिक्षण देतात. म्हणजे दर २१४० माणसांना एक शिक्षक वांटणीस येतो... क्षेत्रफळाच्या मानाने पाहतां, ६४१ चौरस किलोमीटर जागेतून हे शिक्षक विभागले तर दर ४. ९ चौरस किलोमीटरनां एक शिक्षक पडतो. . अर्थात नव्या काबिजादीत सरकारने शिक्षणाची तरतूद अगदीच तुटपुंजी केली असल्याने हजीरीत असा फरक पडतो.