पान:गोमंतक परिचय.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वे वांटण्यांत येतात. म्हणजे पहिली जागा स्त्रियांना मिळाल्यास दुसरी, चौथी अशा पुरुषांना मिळून तिसरी, पांचवी अशा स्त्रियांना मिळतात. शाळेचे दिवस, वेळपत्रक व शिक्षकः-शाळा १० जूनला उघडते व १५ जूनपर्यंत नांवें रजिस्टर करायची मुदत असल्याने, १६ जूनला वर्ग सुरू होऊन १५ मार्चला बंद होतात. दरम्यान रविवार व गुरुवार अशा दोन सुटया दर आठवड्यास असतात. रिपब्लिकच्या स्थापनेची ५ आक्टोबरची सुट्टी, ६ आक्टोबर ते २५ पर्यंत आक्टोबर व्हॅकेशन्स, स्वातंत्र्य दिनोत्सवानिमित्य ( स्पेनच्या कचाटींतून पोर्तुगाल सुटलेला दिवस ) डिसेंबरची पहिली तारीख २४ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत नाताळची रजा, रिपब्लिकच्या हुतात्म्यांप्रीत्यर्थची ३१ जानेवारीची रजा, प्रत्येक म्युनिसिपालिटीने ठरविलेली एक दिवसाची रजा (ही प्रत्येक कोंसेल्यांत निरनिराळी असू शकते) आणि ख्रिस्ती शिमग्याचे चार दिवस अशा रजा असतात. म्हणजे एकंदरीत शाळेचे दिवस वर्षांतन १६५ ते १७० पर्यंत असतात. १६ मार्च ते तीस मार्चपर्यंत प्रिमर ग्रावाच्या व एप्रिल महिन्यांत सेगंद ग्रावाच्या परीक्षा असतात आणि त्यांतून शिक्षकांना काम करावें लागत असते, त्यामुळे मेचा सारा महिना व जूनचे ९ दिवस अशी ४० दिवसांचीच खरी सुट्टी त्यांना मे व्हॅकेशन मध्ये मिळते. शाळा सकाळी नऊ ते बारा व संध्याकाळां तीन ते पांच अशी दुवक्तां मिळ्न पांच तास असते. मध्ये प्रत्येक तासानंतर दहा मिनिटांची सुट्टी मिळते. ज्या शाळांतन मुलांची रोजची सरासरी पन्नासांच्या खाली असते, तेथें एकाच शिक्षकानें पांचही वर्ग चालवावयाचे (! ) असतात. पन्नास ते साठांच्या दरम्यान संख्या असली, तर देखील एकाच शिक्षकाला काम करावे लागते. मात्र मुलांचे दोन गट पाडन सकाळी तीन तास व संध्याकाळी तीन तास असें सहा तास काम शिक्षकाला करावे लागते. ही सरासरी साठांच्या वर गेल्यास दोन शिक्षक. १०० च्या वर ३ अशा प्रमाणाने पुढे शिक्षकांची संख्या वाढते. ततची मुलांची संख्या वगैरेः-१९२७-१९२८ च्या शैक्षणिक सालीं, गोव्यांत सरकारी प्राथमिक शाळा ६४ होत्या व त्यांतून १५२ शिक्षक ९२३१ मुलांमुलींना शिक्षण देत होते. पैकी १०२९ मुलें प्रिमर ग्राव पास झाली होती व ५९६ मुले सेगंद ग्रावाच्या परिक्षेत उत्तीण झाली होती. शिकणाऱ्या मुलांतून