पान:गोमंतक परिचय.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण पहिले. भांडवल यावरील व्याजच ७३ हजार पौंड म्हणजे सुमारे दहालक्ष रुपयांजवळ जाऊ लागले. मद्रास रेल्वे व जी. आय. पी. रेल्वे यांनी आपसांत करार करून वाहतुकीचे दर उतरल्यामुळे सदर्न मराठा रेल्वे व डब्ल्यु. आय. पी. रेल्वे यांची हालचाल थंडावली. त्यांतल्यात्यांत आमची रेल्वे परदेशच्या, घाटांवर जाण्याच्या वाहतुकीवरच, गोव्यांच्या खास व्यापारापेक्षां परदेशच्या घांटावर जाण्याच्या वाहतुकीवरच विशेष अवलंबून असल्यामुळे तिचे तर उत्पन्न मुळीच इतकें बसलें की, १८९९ ते १९०१ सालाच्या सुमारास इतर सारी वाहतुक बंद पडून केवळ टपाल नेणारी एकच प्यासेंजर गाडी तेवढी तिच्यावरून फे-या करीत होती. त्यामुळे या सुमारास पोर्तुगीज सरकारला व्याजाशिवाय रेल्वेच्या चालू खर्चाची देखील सोय पदरची करावी लागली होती. तिकडे सदर्न मराठा रेल्वेचे उत्पन्नही बरेच धोक्यांत आले. तेव्हां उभय रेल्वेच्या अधिकारी मंडळाच्या लक्ष्यांत, दोघांचेही हितसंबंध एकच असल्याचे येऊन त्यांनी त्या सामायिक चालविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे १९०२ साली करार होऊन तेव्हांपासून ह्या रेल्वेचा कारभार सदने मराठा रेलवेने हाती घेतला. ____ कराराचा परिणाम लागलीच दिसून आला. वाहतुक भराभर वाढू लागून धक्क्याची लांबी आगबोटीस उणी पडू लागल्यामुळे तो ८६८ फुटांनी वाढविण्यांत आला. पाण्यांतील आडव्या तटाची लांबी आणखी ५०० फूट बाहेर नेली गेली व त्याला तेथून धक्क्याशी समांतर असा एक पुनः ९०० फुटांचा उभा तट पाण्यांतच बांधण्यात आल्यामुळे मूळच्या तीन लहान आगबोटींच्या ऐवजी आतां एकदम ४ मोठ्या आगबोटी धक्क्यास लागण्याची सोय झाली. १९०३ पासून रेल्वेचे उत्पन्न भराभर वाढत जाऊ लागले. शेवटी १९२७ सालीं (स्थापनेपासून ४१ वर्षांनी) व्याज व खर्च वजा जातां १९९० पौंडाचा नफा, (पौंडाचा भाव १३॥ रुपये धरल्यास २६८६५ रुपये) मूळच्या करारामुळे कंपनी व पोर्तुगीज सरकार यांना आपसांस वांटून घेण्यासाठी मिळाला. अजूनहि वाहतुक वाढतीच आहे त्यामुळे धक्का आणखीहि वाढविण्याची योजना तयार झाली आहे. मालाचा चढउतार करण्यासाठी एक ते पांच टन शक्तीच्या १६ चक्क्या आहेत माल सांठविण्याकरतां तीन मोठाल्या वखारी आहेत. शिवाय रॉली ब्रदर्स कंपनी व व्हॉल कार्ट ब्रदर्स कंपनी यांनी स्वतःची एक एक प्रचंड वखार अलीकडेच बांधली आहे ती निराळीच. मुरगांव ते मुंबईचे भाडे तीनही क्लासाचे अनुक्रमें पहिला वर्ग रु. ५०-१० आणे दुसरा वर्ग रु. २५-५ व तिसरा वर्ग ९ रु. ७ आणे असून हा प्रवास २७ तासांच्या