पान:गोमंतक परिचय.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ४४. उपक्रम होय. फ्रान्स, जर्मनी, इत्यादि प्रगत देशांतून बाल विद्यालये असतात व त्यांतून स्त्रीशिक्षकांची नेमणूक होत असते, तिचा हा प्रतिध्वनि होता. परंतु • त्यादेशांत शिक्षण मातृभाषेतून चालत असून, प्राथमिक शाळांतील मुलाच वय १० च्या आंतच असते आणि तेथील सामाजिक व्यवस्था इकडच्यापेक्षा पुष्कळच भिन्न असून स्त्रियांना त्या समाजांत इकडच्या ख्रिस्तीसमाजापेक्षाही पुष्कळच स्वातंत्र्य असते. स्त्रीशिक्षणाचा प्रसार इकडे फारसा झाला नसल्याने, साहजिकच असे होऊ लागले आहे की, नॉर्मल स्कुलांतून उत्तीर्ण होणाऱ्या स्त्रियांचा शैक्षणिक दर्जा, पुरुष विद्यार्थ्यांपेक्षां नेहेमीच कमी असतो. याला अर्थात्च अपवाद आहेत पण ते अगदीच थोडे आहेत. आणि उपरोक्त प्राधान्यामुळे, लायक पुरुष उमेदवारांना मागे जावें लागून, अशा स्त्रीउमेदवारांना जागा मिळू लागल्या. शाळेत येणाऱ्या मुलांचे वय ६ पासून वीसपर्यंत असते. त्यांत मुलगेही असतात व मुलीही असतात. अर्थात् त्यामुळे शिस्तीत थोडासा ढिलाइंचा भाग दिसणे अपरिहार्य झाले. त्याचप्रमाणे, प्राथमिक शिक्षण परभाषेतून व तेही कमी लायकीच्या स्त्रीशिक्षकांकडून मिळवावें लागल्याने, शिक्षणाचे - काम जरा असमाधानकारकच होऊ लागले. परंतु युरोपियन समाजाचे व त्यांतील एकंदर सुधारणांचे कलम या समाजावर करूं पाहणाऱ्या व्यक्तींचेंच प्राधान्य - सार्वजनिक शिक्षणबोर्डीत असल्यामुळे, हीच योजना पुढे चालली व १९२१ सालीं • गोमंतकांतील साऱ्याच शाळा मिश्र बनन, झालेल्या विरोधास न जुमानतां प्राथमिक शिक्षणांत सहशिक्षणाचे तत्व सर्वसामान्य करण्यांत आले. अर्थात्च जुन्या योजनेप्रमाणे असलेली स्वतंत्र गर्लस्कुलें नाहींशी होऊन, त्यांतील शिक्षकिणी पुरुष शिक्षकांसह एकाच शाळेतून आज शिक्षण देत आहेत. वरवर पाहिल्यास शाळांची संख्या कमी झाल्यासारखी दिसते खरी. परंतु शिक्षकांची संख्या वाढल्याने ती लक्ष्यांत घेता येत नाही. नेमणुकांच्या बाबतींत, आजला तरी स्त्रियांचीच चहुसंख्या असण्याजोगा कायदा आहे. शिक्षणाचा दर्जा अर्थात्च त्या मानाचाच आहे. नैतिक बाबतींतही कांही अनिष्ट उदाहरणे या सात वर्षांच्या अवधींत दिसून आली आहेत. परंतु एकंदर ९४ शाळांतून ९४ पुरुष शिक्षक व ५४ स्त्री शिक्षक मिळून १५२ प्रोफेसर ९२३१ मुलांमुलींना शिक्षण देतात, त्यांत ही उदाहरणे विशेष लक्ष्यात घेण्याइतकी आहेत असे वाटत नाही. तूर्त अमलांत असलेल्या कायद्याने शाळेत एकच जागा असली, तर ती लिंगभेदाचा विचार न करतां, गुणानुक्रमाने लायक अशा उमेदवाराला मिळते. आणि पुढच्या जागा आळीपाळीनें