पान:गोमंतक परिचय.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. प्रकरण ६ वे . आज्युत ( असिस्टंट ). रॅजेंत ( हेड मास्तर). तिसरा वर्ग २८॥- ४०४-४... दुसरा वर्ग ...:३२॥ ४४॥८ , पहिला वर्ग ४२॥ ५४. - पगारांतून पेन्शनफंडाला शेकडा पांच टक्के कापून घेण्याची पद्धति पूर्वी पासून होती त्यामुळे ह्या साऱ्या पगारांत तेवढा काट होई. १९१७ साली रॅजेंत व आज्युंत यांच्या पगारांतील फरक काढून सर्वांना एकाच स्केलाने पगार मिळू लागला. आणि स्केलांतही बदल होऊन वर्गाची प्रमोशनें सहा सहा वर्षांनी होऊ लागली. त्यांत तिसरा वर्ग ४०४६४; दुसरा वर्ग ५०४१३४ व पहिला वर्ग.६०४६४ असा दरमहा ठरला. पेन्शनफंड शेकडा पांच टक्के कापून घेण्यांत येतच होता. . . . इ. स. १९२२ साली महायुद्धामुळे नाण्याची किंमत उतरून साऱ्याच नोकरवर्गाचे हाल होऊ लागले, तेव्हां सर्रास झालेल्या पगारवाढीत तिसरा वर्ग: ५९४८४, दुसरा वर्ग ७४४३४, व पहिला वर्ग ८५४११४ असा मासिक पगार मिळत आहे. यांतून शेकडा पांच टक्के पेन्शनफंड व दोन टक्के इन्कमट्याक्स, कापला जातो. प्राथमिक शिक्षकांना प्रोफेसर ही संज्ञा असून त्यांना ज्या ज्या वेळी सरकारांतून प्रवास खर्च मिळतो, त्या त्या वेळी तो रेल्वेतून सेकंड क्लासचा व आगबोटीत फर्स्ट क्लासचा असतो. शिवाय राहावयास घर सरकार देते. घरें देतां न आल्यास घरभाडे देण्याची. जबाबदारी म्युनिसिपालिटीवर असते. शेवटच्या कायद्याप्रमाणे ह्या भाड्याचे दर पणजी व वास्को शहरांतून मासिक ३० रुपये, मडगांव व म्हापशें शहरांत मासिक २० रुपये, आणि इतर ठिकाणी दहा रुपये ठरले असून, शिक्षकांना घरे नसलेल्या ठिकाणी ते मिळत असते. । सहशिक्षणाचा उपक्रम व त्याचे परिणामः-१९०७ सालापूर्वी मुलींच्या स्वतंत्र शाळा नसणाऱ्या गांवीं, त्यांना मुलांच्याच शाळेत घेण्यात येत होते, असे आम्ही पूर्वी सांगितलेच आहे. अशा शाळांना सहशिक्षणाच्या शाळा ( Escolas mixtas ) हे नांव मिळून त्यांवर नेमण्यांत येणाऱ्या शिक्षकांत. प्राधान्येकरून स्त्रीशिक्षकांचीच नेमणूक व्हावयाचे ठरले. हाच सहशिक्षणाचा