पान:गोमंतक परिचय.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय शिक्षकांचा दर्जा व आर्थिक स्थितिः-सुरुवातीच्या काळांत शिक्षकाचें काम पायांच्याच हातून होई व त्याबद्दल त्यांना निराळें वेतन लागत नसे. आणि पुढेदेखील इतर शिक्षकांना मिळत असलेल्या पगाराच्या निमे वेतन घेऊन पाद्री शिक्षकाचे काम करीत. त्याचप्रमाणे सरकारी दुभाषांकडूनहि शिक्षकाचे काम घण्यात येत होते. इ. स. १८०० साली, गोवें शहरांतील व पणजीच्या प्राथमिक शिक्षकांना सालिना ३०० असफ्या ( १५० रु.) वेतन होते आणि म्हापशें व मडगांव येथील शिक्षक सालिना २०० असोवरच काम करीत, इ.स. १८३१ त जुन्या काबिजादींतील शिक्षकांस ६०० असा व नव्या काबिजादीत ३०० असा सालिना पगार मिळे. । मध्यंतरीही पगारांत बरीच घडामोड झाली असावी, परंतु तिची नीटशी माहिती मिळाली नाही. - इसवी सन १९०२ साली सेगुंद क्लासाच्या शिक्षकांना सालिना ३६८८५४ ( म्हणजे ३०४११४१ दरमहा ) व प्रिमर क्लासाच्या शिक्षकांनां २२७८ १२४ ( म्हणजे दरमहा १८४१५४८ ) मिळत असत. आणि ह्या पगारावर दर पांच वर्षांनी एक तृतियांशाची बढती दोनदां मिळे. आणि पंचवीस वर्षे नोकरी भरतांच भर पेन्शन मिळे. ( पोर्तुगीज राजवटीत पेन्शन पगाराइतकेंच असते). १९०३ सालापासून गोव्याचे अंदाजपत्रक पोर्तुगालमधून तेथील नाण्यांतून तयार होऊन येऊं लागून त्यांत रुपयास चारशें रैसाप्रमाणे वरीलच पगार आकारण्यांत आला. परंतु वर सांगितलेली पगारवाढ काढून टाकून त्याऐवजी प्रोफेसरच्या नोकरीच्या मुदतीप्रमाणे, पगाराच्या बाबतीत त्यांचे तीन वर्ग पाडण्यात आले. शेवटच्या तिसऱ्या वर्गातून दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळावयाला ८ वर्षे नोकरी करावी लागे व दुसऱ्या वर्गातून पहिल्या वर्गात प्रवेश ४ वर्षांनी होई. मासिक पगाराचे स्केल खालीलप्रमाणे होते. प्रिमर ग्रावाचे शिक्षक सेगुंद ग्रावाचे. तिसरा वर्ग २५८. २१ दुसरा वर्ग- २८॥ ..... पहिला वर्ग ४७॥ १९१३ साली रैसांचा भाव रु. ४०० ऐवजी ३५० केल्यामुळे ह्या पगारांत साहजिकच थोडीशी वाढ झाली. आणि त्यांना खालील स्केलाने पगार मिळू लागला.