पान:गोमंतक परिचय.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें रसींवरून स्थानिक तपासणीमंडळे गव्हर्नर नेमी. फार अंतरावर असलेल्या शाळांची तपासणी स्थानिक मंडळे आपल्या प्रतिनिधींकड़न करीत असत. इ. स. १८८१ साली, सार्वजनिक शिक्षणतपासणीमंडळाचे काम कायद्याने नियमबद्ध झाले. आणि पुढे १८८४ त पहिल्यानेच इन्स्पेक्टरचा हुद्दा निर्माण करण्यांत येऊन, गोव्यातर्फेचे पार्लमेंटचे सभासद, फ्रांसीइकु लुइझ गोमिश् यांची त्या जागी नेमणूक झाली. परंतु सिन्योर गोमिश हे ह्या हुद्याचा चार्ज घ्यावयास आपल्या मातृभूमीस येतांना वाटेतच त्यांचे निधन झाल्यामुळे ही योजना तशीच राहिली. नंतर १८९२ साली प्रत्येक शिक्षणक्रमावर तपासणीची स्वतंत्र योजना झाली व प्राथमिक शिक्षणाच्या इन्स्पेक्टरच्या जागी मडगांवचे रहिवासी, सुप्रसिद्ध बॅनार्दु फ्रांसीइकु दा कोश्त, पार्लमेंटचेच गोव्यातर्फेचे देपुताद ( सभासद ) हे नेमून आले. यांनी आपल्या तीनच वर्षांच्या कारकिर्दीत शाळांची पुष्कळ सुधारणा केली. परंतु मागे सांगिल्याप्रमाणे, १८९५ च्या बडांत त्यांच्यावर सरकारची इतराजी होऊन त्यांना दीव येथे हद्दपार करण्यांत आले. तेथेच ते निधन पावल्यामुळे, पुढे हा हुद्दा तोमाझ मौरांव, बारांव द कुंभारजुव या गहस्थांकडे गेला. त्यांच्या निधनानंतर १९०४ साली ही जागाच काढून टाकून प्राथमिक शाळांची तपासणी कोमिसायु सुपेरियोर दुज इश्तदुश या नात्याने सरकारचे जनरल सेक्रेटरी यांनीच करावी असें ठरविण्यात आले. १९०७ सालीं पुनः इन्स्पेक्टरची जागा भरण्यांत आली. आणि तत ह्या जागी, सिं. मानयेल आंतनिज द आमोर नांवाचे लिपझिग येथे शिक्षण घेतलेले युरोपियन आहेत. त्यांना आतां 'प्राथमिक शिक्षणाचे चीफ' असें सरकारी संबोधन आहे. मध्यंतरी डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन हा हुद्दा इकडे निर्माण करण्यांत आला,तेव्हां त्यांच्या हाताखाली दोन सब-इन्स्पेक्टर काम करीत व आमोर यांना दप्तरखान्यावर ठेविलें होतें. तर्त आमोर रजेवर गेले असल्याने त्यांचे काम नॉर्मलचे डायरेक्टर पाहतात.. तपासणीची पद्धतिः-दरसाल एकदातरी प्रत्येक शाळा इन्स्पेक्टरने तपासलीच पाहिजे. त्यांचा शेरा शिक्षकांना प्रतिकूल असला, तर त्यावर शिक्षणबोर्डाकडे अपील करण्याचा हक्क शिक्षकांना आहे. तसें अपील न झाल्यास शेऱ्यांत नमूद केलेल्या उणीवा काढून टाकल्या आहेत की नाही, ते पाहण्यासाठी दुसरी तपासणी करावी लागते व लागोपाठ ४ तपासण्यांतून न सधरणारा शिक्षक कायम नेमणुकीचा असल्यास, गव्हर्नरकडून त्याची बदली करण्यांत येते आणि तात्पुरता प्रोबेशनर असल्यास काढून टाकण्यांत येते.