पान:गोमंतक परिचय.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ६० मुले असतात. म्हणजे एकंदरीत ५४०० मुलें या शाळांतून साक्षर होतात. पण पुढे यांपैकी निम्मी मुलें सरकारी शाळांतून शिकावयास जात असल्याने, सुमारे अडीच हजार मुलांना या शाळांचा खरा फायदा मिळतो. प्राथमिक शिक्षणाचा खर्च मुलांवर किती पडतोः-इ. स. १९०७ च्या सुधारणेपूर्वीची हकीकत मागे आलीच आहे. म्हणजे प्राथमिक कोर्स पांच वर्षांचा धरल्यास, ह्या पांच वर्षांत सव्वा रुपया प्रवेश फीबद्दल, सेगुंद ग्रावाच्या परिक्षेस जातांना हजीरी बुकावर शेवटचा शेरा घ्यावयाचा त्याला चार आणे व उभय परिक्षांच्या सर्टिफिकिटांचा एक रुपया, एकून पूर्वी दर मुलास सेगुंद ग्रावपर्यंत शिक्षण मिळवायला अडीच रुपये बसत. १९०७ सालापासून १९२४ पर्यंत, पहिल्या चार क्लासांत (प्रिमेर ग्रावपर्यंत चार पुस्तकें ) प्रवेश फी नव्हती, सेगुंद ग्रावाची प्रवेश फी चार आणे व शेवटचा शेरा ४ आणे मिळून आठ आणे; प्रिमेर ग्रावाच्या परिक्षेची फी ४ आणे, सेगंद ग्रावाच्या परिक्षेची फी ( १९१३ पूर्वी एक रुपया व पुढे रेसाचा दर वाढून रु. ४०० रेसांऐवजी ३५० रेंस ठरल्याने) १४२४४ व सेगुंद ग्रावाच्या सर्टिफिकीटास सुमारे १२ आणे मिळून २४६०४ खर्च साऱ्या प्राथमिक शिक्षणक्रमास येई. वर्ग बदलावयाच्या वेळी प्रत्येक क्लासाच्या ज्या परीक्षा होतात, त्याच्या सर्टिफिकिटाला ४ आणे प्रमाणे एकंदर पांच क्लासांना सव्वा रुपया, सेगुंद ग्रावाची प्रवेश फी ६ आणे व निर्गत फी ६ आणे, एवढा खर्च १९२४ साली नवा आल्याने आतां सुमारे पावणे पांच रुपयांत प्राथमिक पोर्तुगीज कोर्स होतो. मग त्यांत मुलाने कितीही वर्षे घालविली तरी फीत वाढ होत नसते. प्राथमिक शिक्षणावरील देखरेखः-मागें सांगितल्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण सरकारच्या हाती १९३६ साली गेले. प्रारंभी शाळांची तपासणी मिलिटरी अम्मलदारांकडेच होती. पुढे १८४१ साली त्यासाठी तपासणी कमीशनें ( Corpos Inspectores ) नांवाची मंडळे उत्पन्न करण्यांत आली. या मंडलांत, कोंसेल्याचे आदमिनिस्वादोर, म्युनिसिपालिटीचा मुखत्यार, कोमुनदादीनी निवडलेले दोन सभासद व प्राथमिक शिक्षकांपैकी एक शिक्षक, मिळन पांच सभासद असत. शाळेत शिक्षक योग्य वेळी येतात की, नाहीं, तें गांवच्या रॅजिदोराने त्रैमासिक सर्टिफिकिटाच्या द्वारे सांगावयाचा परिपाठ होता. इ. स. १८६९ सालीं सार्वजनिक शिक्षणतपासणीमंडळाची स्थापना झाली. पण या मंडळाची कार्यपद्धति कायद्याने ठरविली गेली नव्हती. हे मंडळ शिफारसी करी व त्या शिफा ३