पान:गोमंतक परिचय.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ३६ नॅॉर्मल स्कुलांत प्रवेश मिळावयाला, लिसेवाच्या तिसऱ्या वर्षाचे सर्टिफिकिट आवश्यक ठरविले होते. परंतु ज्यांना हे सर्टिफिकिट नव्हते, त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशपरिक्षा ठेवण्यांत आली होती. वरील अभ्यासक्रमावरून पाहतां, नॅॉर्मलकोसांची सुधारणा बरीच झाल्याचे दिसून येते. दुसऱ्या वर्षाचे सर्टिफिकिट आजूतांना ( असिस्टंटना ) आवश्यक ठेविले होते व संपूर्ण अभ्यासक्रम असलेल्यांनाच रेंजेंत ( हेडमास्तर ) होतां येई... हिंदूंना प्राथमिक प्रोफेसर होण्याची बंदीः-ह्या कायद्यांत असेंहि एक कलम होते की, प्राथमिक शिक्षणांत ख्रिस्ती डाक्ट्रीन हा विषय असल्यामुळे, केवळ सरकारीधर्म पाळणाऱ्या इसमांना मात्र नॅॉर्मल शाळेत प्रवेश मिळेल. हिंदुलोक पूर्वी प्राथमिक प्रोफेसर झालेच नव्हते. कारण, पोर्तुगीज शिक्षणाकडे त्यांचा कल पूर्वीपासूनच एकंदरीत कमी होता. पण, ज्या कार्त कोक्तितुसियोनालच्या पायावर सनदशीर राज्यपद्धति पोर्तुगालांत स्थापन झाली होती, त्यांतील कलमांत 'सरकारी नोक-यांत पात्रता व गुण यांशिवाय दुसरी कोणतीच कसोटी लावण्यांत येणार नाही' असे स्पष्ट सांगितले होतें. ( कलम १४३ पोट कलम १३) त्यामुळे हिंदुसमाजास उपरोक्त बंदी म्हणजे आपल्या कायदेशीर हक्कांवरील अतिक्रमणासारखीच वाटली. व त्यासाठी पणजी येथे एक प्रचंड जाहीरसभा भरवून हिंदुसमाजाने सदर बंदीचा निषेध केला.. तथापि राजसत्ता नष्ट होईतोवर ही बंदी कायमच राहिली. पुढे रिपब्लिकची स्थापना होतांच धर्म व राजकारण यांची फारकत झाली व त्याबरोबरच ख्रिस्ती डॉक्ट्रीन शिकविण्याचे इतःपर कारण नसल्यामुळे ही अपमानकारक बंदीही गेली. शालेय फंड (Fundo Escolar):-ही १९०७ सालच्या सुधारणेतील एक व्यवस्था अंमलांत आली. सेगंद ग्रावाच्या प्रवेशफीचे पैसे, परिक्षेची फी, लिसेवची प्रवेशफी, पूर्वीचा शैक्षणिक कर, व यापूर्वी ज्या संस्थांनी आपल्या स्वतंत्र शाळा ठेविल्या होत्या, त्यांच्याकडून शिक्षकास मिळत असणाऱ्या पगाराची रक्कम, इत्यादि सर्व एकत्र करून त्याचा शालेय फंड नांवाचा एक फंड स्थापण्यात -आला व त्यांतून, शाळागृहे बांधणे, संस्थांतर्फे चालणाऱ्या शिक्षकांचा पगार, इत्यादि खर्च होऊ लागला. फंडाचा कारभार पूर्वी जमाबंदी खात्यांतनच चालत होता परंतु अलीकडे तो स्वतंत्र बोडीकडून होत असतो. रिपब्लिकन अमदानीतः-रिपब्लिकच्या अमदानींत साऱ्याच शिक्षणाची सुधारणा झाली आहे. शाळांची संख्या, शिक्षणपद्धतीत सुधारणा, शिक्षणोपयोगी