पान:गोमंतक परिचय.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६३ पूर्वी प्रिमर ग्रावाच्या परीक्षा कोंसेल्याच्या ( तालुक्याच्या ) गांवीं, तीन मेंबरांच्या ज्युरींसमोर लेखी व तोंडी घेण्यात येत होत्या. परिक्षकांत दोन शिक्षक व एक सरकारनियोजित प्रेसिडेंट असे. त्याऐवजी आतां त्या, प्रत्येक शाळेत इन्स्पेक्टर, आदमिनिस्वादोर, किंवा देलेगाद लोकाल ( इन्स्पेक्टरचा बिनपगारी हस्तक ) यांच्या समोर स्वतः शिक्षकानेच घ्यावयाचे ठरले. पूर्वी शाळेत येणाऱ्या मुलांनां, प्रवेश फी चार आणे व जातेवेळींची फी चार आणे द्यावी लागे, त्याऐवजी आतां ती फक्त सेगुंद ग्रावाच्याच मुलांकडून घेण्यांत येऊ लागली. प्रिमर ग्रावाच्या परिक्षेस चार आणे व सेगुंद ग्रावाच्या परिक्षेस एक रुपया की ठेवण्यात येऊन ती शालेय फंडाच्या स्टांपच्या रूपानें वसूल होई.. नॉर्मल स्कुलांतील फेरफारः-नॉर्मल स्कुलाचा कोर्स तीन वर्षाचा केला. आणि त्याचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आंखण्यांत आला. १ पोर्तुगीज भाषा व वाङ्मय २ फ्रेंच भाषा ३ अंकगणीत व साधी भूमिति ( Plana ) ४ सृष्टिशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, आणि त्यांचे शेतकी व आरोग्य यांच्याशी संबंध. ५ शेतीचे प्रत्यक्ष ज्ञान ६ शेतीविषयक व व्यापारी जमाखर्च ७ नीतिशिक्षण, नागरिकांचे हक्क व कर्तव्य, अर्थशास्त्राचे गृहोपयोगी ज्ञान व स्त्रियांसाठी गृहिणीधर्म ८ खगोल विद्या, कालमापन, जगाचा भूगोलेतिहास . .९ पोर्तुगाल व त्याच्या सत्तेखालच्या प्रदेशाचा भूगोलेतिहास १० अक्षर, रेषाचित्रकला, ऑर्नमेंटल ड्राइंग व नकाशांच्या नकला.. . ११ आजारी मुलांना तात्पुरते उपचार ( फर्स्ट एड ) १२ शिक्षणपद्धतिशास्त्र, त्याचा इतिहास, प्रायोगिक शिक्षण . . कला व प्राथमिक शिक्षणाचे ज्ञान. १३ व्यायाम १४ संगीतशास्त्र व गायन १५ स्त्रियांकरतां शिवणकला व विणकाम.