पान:गोमंतक परिचय.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय आले. नवीन अंदाज साडे तेरा लाख पौंडांचा झाला होता व ह्या जादा भांडवलावर ६ टक्क्यांची हमी स्वीकारून पोर्तुगीज सरकारने त्याला मंजुरी दिली. रेल्वेचें बांधकाम पूर्ण होऊन ती सदर्न मराठा रेल्वेस जोडून तेथपर्यंत रहदारी सुरू होई तोवर १८८८ साल उघडले. सरहद्दीपर्यंत रेल्वेची लांबी ५०* मैलांची असून मुरगांव तें कुळेपर्यंतचा ३८ मैलांचा भाग सामान्यतः सपाटच आहे म्हटले तरी चालेल. तेथपर्यंतची उंची फक्त २३८ फुटांचीच आहे. त्यामुळे या भागांत रस्त्याला शेकडा एक टक्याचाच कमाल चढाव दिला गेला. पुढचे बारा मैल मात्र चढाव बराच खडा आहे व तो शेकडा २॥ या मानानें तोडला आहे. कुळे ते क्यासलरॉक ह्या दोन स्टेशनांमधील सपाटीचे अंतर १२८७ फुटांचे आहे. हा सारा घांट वळणा वळणानें गर्द व गगनचुंबित झाडीतून दूधसागराच्या सुंदर धबधब्याच्या लगतूनच गेल्यामुळे प्रवाशांस दर खेपेस हा प्रवास विशेषच आकर्षक वाटतो. विशेषतः दुधसागरचा धबधबा, दुधसागर स्टेशनावरून दिसतो. सोनावळीचे स्टेशन व त्यापुढील सुमारे दोन अडीच मैलांचा रस्ता, नाग मोडींतून दिसतो. तें दृश्य फारच मनोरम दिसते. पावसाळ्यांत जागोजागच्या कडेकपारीतून धवलवर्ण उड्या घेत असलेले अनेक लहान मोठे जलप्रवाह पाहतांच दुधसागररूपी सहस्रफणी नागराजाची ही पिल्लंच आपल्या जनकाच्या भेटीस उत्सुक होऊन चोंहोंकडून धांवत असल्यासारखा दिसतात. दुधसागरचे वर्णन स्वतंत्रपणे पुढे प्रेक्षणीय स्थळांत येईलच. प्रारंभी ह्या रेल्वेची, मुरगांव, वास्कोदिगामा, दाभोली, कांसावली, माजोर्डे, मडगांव, चादर, सावर्डे, कालें, कुळे व दुधसागर येवढीच स्टेशनें होती. पण पुढे वाहतुक वाढतांच कुळे व दुधसागरच्या दरम्यान सोनावळी हे स्टेशन आणि दुधसागर व क्यासलरॉक मध्ये करंझोल अशी दोन स्टेशनें घांटांत गाड्यांना वेळ मोडूं नये म्हणून केवळ क्रॉसिंगकरतांच उघडण्यात आली. त्यांवर उतारूंची किंवा मालाची चढ उतर होत नसते. त्याचप्रमाणे दाभोली स्टेशन हे केवळ उतारूंच्या सोयीसाठीच उघडले आहे. तेथे गाड्या क्रॉस होण्याची सोय नाही. रेल्वेच्या सोयीसाठी मुरगाव येथे कंपनीकडून ११९४ फूट लांब एक धक्का बांधण्यांत आला व लाटा जावण्यासाठी त्याला ११७६ फुटांचा आडवा तटहि बांधला गेला. परतु सन १९०२ पर्यंत ही रेल्वे पोर्तुगीज सरकारला केवळ गळ्यांतील लोढण्यासारखी अडचणीची व जबरदस्त नुकसानीची झाली. कारण मूळचे भांडवल व दुरुस्त -- * टीप-सरहद्दीपासून क्यासलरॉक स्टेशनपर्यंतचा सुमारे २ मैलांचा रस्ता सदर्न मराठा रेल्वेने इंग्रजी अंमलांत बांधला आहे.