पान:गोमंतक परिचय.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय - शाळांच्या संख्येतही बरीच भर पडली. त्यामुळे पहिल्या क्लासाच्या सरकारी शाळा ८६ होऊन मुलींसाठी ८ शाळा झाल्या. त्याचप्रमाणे दुसऱ्या क्लासाच्या शाळा १४ करण्यांत आल्या.. . नार्मल स्कूलचा अभ्यासक्रम पूर्वीसारखा दोनच वर्षे राहिला व त्यांत अंकगणीताची संपूर्ण माहिती, नीतिनियम व ख्रिस्तीपुराणे, अर्थशास्त्राचे गृहोपयोगी व व्यवहारोपयी ज्ञान, हे विषय नवे घेण्यात आले. जगाच्या इतिहासाला काट मिळाला. तसेच आणखीही किरकोळ फेरफार झाले. - इ. स. १९०७ मधील फेरफारः-या साली प्राथमिक शिक्षणाच्या व्यवस्थेत बरेच फेरफार झाले. अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणेच दोन ग्रावांत (डिग्रीत) विभागला गेला. प्रिमर ग्रावांत लेखनवाचन, गणिताची साधी चार कृत्ये, • दशांश अपूर्णांक, मेट्रिक सिस्टीम व देशी वजनेंमा यांची सप्रयोग माहिती, साधा व्यायाम व उघड्या हवेतील खेळ, देशी शेतीची सामान्य माहिती, रेषा चित्रकलेची मूलतत्वे, नीतिनियम व ख्रिस्त्यांसाठी डॉक्टिन, गहोपयोगी अर्थशास्त्राचे सामान्य ज्ञान, संगीताचें व गायनाचे काहींसें ज्ञान हे विषय असून, स्त्रीवर्गासाठी सुईदोऱ्याचे काम विशेष असे. सेगुंद ग्रावांत ह्या विषयांखेरीज, पोर्तगीज व्याकरणाचें सामान्य व व्यावहारिक स्वरूपाचे ज्ञान, शेती, सृष्टिज्ञान, व्यवहारी अपूर्णांक व नेहेमींच्या व्यवहारांतील उदाहरणें, एकंदर पोर्तुगीज प्रांताचा भूगोलेतिहास, कालमापन, भूगोल खगोलाची सामान्य माहिती, राज्यपद्धतीचे ज्ञान, नागरिकांची कर्तव्ये व हक्क, रेषाचित्रकला, भूमितीच्या व्याख्या आणि साध्या जिनसांची नक्कल करण्यापुरतें चित्रकलेचे ज्ञान, इतके विषय येऊ लागले. अर्थात् गणितांत बराच काट बसला.' पूर्वी शाळांचे दोन वर्ग असत ते नष्ट होऊन साऱ्याच शाळा सेगुंद ग्रावपर्यंत शिक्षण देणाऱ्या बनविल्या गेल्या. पूर्वीच्या प्रिमर क्लासाच्या शाळांतील, नार्मलचे १ वर्षाचे सर्टिफिकीट घेतलेल्या शिक्षकांना आजूत हे नांव मिळाले व त्यांना पगारही इतरांपेक्षा पूर्वीप्रमाणे कमीच राहिला. संस्थांनी स्थापलेला शाळाही सरकारने आपल्या ताब्यात घेतल्या आणि त्यांतील शिक्षकांचा पगार इतरांबरोबर करून, तो सरकारी तिजोरीतून द्यावयाची वहिवाट घातली. संस्थांतून जो पगार शिक्षकांना मिळे, त्याची रक्कम सरकारी तिजोरीत भरावयास लावून शालेय फंडांत ( Fundo Escolar ) जमा केली. स्त्रीशिक्षणाच्या शाळा पूर्वीप्रमाणेच अजूनही स्वतंत्रच होत्या. शिवाय ज्या ठिकाणी अशा स्वतंत्र शाळा नव्हत्या, त्या ठिकाणी मुलांच्या शाळांतूनच मुलींचीही सोय करविली.