पान:गोमंतक परिचय.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३ प्रकरण ६ वें शिक्षा ठेवण्यात आल्या. व या नियमाच्या अंमलबजावणीसाठी शालेय मुलांची खानेसमारी फर्माविण्यांत आली. खेरीज मुलांच्या अभ्यासक्रमांत, त्रैराशिक, प्रमाणगणीत, आरोग्यशास्त्र व पोर्तुगीजभाषेचे जरा विशेष ज्ञान, इतकी वाढ होऊन मुलींना, गृहोपयोगी अर्थशास्त्र, सूपशास्त्राची माहिती, रंगाचे भरतकाम, टेलरिंग इत्यादि विषय नवे ठेविले होते. परंतु याच्या अंमलबजावणीला हवी असलेली साधनसामुग्री नसल्यामुळे हा कायदा पुस्तकांतच राहिला. फर्नीचरची थोडीशी सोय मात्र शाळांतून झाली. इ. स. १८८२ साली नॉर्मलचा कोर्स सुधारण्यांत आला. नॉर्मल कोर्स काढल्याशिवाय शिक्षकाची जागा मिळू नये, असें १८७९ सालींच ठरले होते. हा कोर्स पूर्वी प्रमाणेच द्विवार्षिक होता. पहिल्या वर्षी पोर्तुगीज व्याकरणाचे पूर्ण ज्ञान व निबंधलेखन, प्रमाणगणीत व त्याचे निरानिराळे उपयोग, वजनें मा, गोमंतक व पोर्तुगीज मुलखाची भौगोलिक माहिती आणि जगाच्या भूगोलाची सामान्य माहिती; व शिक्षणशास्त्राचे सप्रयोग ज्ञान इतके विषय होते. आणि दुसऱ्या वर्षांत प्रथम वर्षांतील विषयांशिवाय जगाच्या इतिहासाचे ज्ञान, कालमापन विद्या, चित्रकलेचे जरा विस्तृत ज्ञान व सप्रयोग शेतकी इतके विषय होते. शिक्षणकलेच्या प्रयोगा .. करितां पणजीच्या प्राथमिक शाळा नॉर्मल स्कुलास जोडण्यात आल्या. ____इ. स. १८९२ चे स्थित्यंतरः-या सालच्या सप्टेंबर महिन्यांत प्राथमिक शिक्षणविषयक असा जो कायदा पास झाला, त्यांत शाळांसाठी पाडलेल्या पूर्वीच्या सहा विभागांचे, क्षेत्रफळाच्या प्रमाणाने ११ विभाग ठरविण्यांत आले. अभ्यासक्रमांत छाटाछाट होऊन तो १८६९ च्या स्वरूपावर नेण्यांत आला. परंतु या कायद्याचीही अंमलबजावणी झाली नाही. कारण त्याच साली त्या वेळचे मिनिस्टर फे!र द आमाराल यांनी शिक्षणाची पुनर्घटना केल्यामुळे त्यांचीच सुधारणा इकडे अमलांत आली. या सुधारणांनी अभ्यासक्रम जवळजवळ १८६९ चाच ठेविला, तरी त्यांत नागरिकांची कर्तव्ये व रेषाचित्रकला ह्यांचा समावेश झाला होता. आठ वर्षांनी या अभ्यासक्रमांत व्यायाम, सामुदायिक गायन व शेतकी, ज्ञान, हे विषय पहिल्या क्लासांत आणि अर्थशास्त्राचे शेतकी व व्यापारोपयोगी नियम, पदार्थविज्ञान, रसायन व सृष्टिशास्त्र यांची मूलतत्वे व आरोग्यरक्षणाचें सामान्य ज्ञान, हे विषय दुसऱ्या क्लासांत वाढविण्याचा अधिकार गव्हर्नरसाहेबांना दिला होता. मुलींच्या शाळांतूनही गृहोपयुक्त अर्थशास्त्र, आरोग्यशास्त्राचे नियम, ऑनर्नामेंटल चित्रकलेचे शिवणकलेपुरतें ज्ञान, हिशेब व सृष्टिज्ञानाचे नियम हे विषय वाढवावयाचे होते. परंतु हा वाढावा देखील कागदांतच राहिला. ३