पान:गोमंतक परिचय.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६वें इ. सन १८४४ मध्ये पोर्तुगालांत शैक्षणिक सुधारणेचा जो कायदा पास झाला, त्याने प्राथमिक शिक्षणाचे दोन टप्पे Graus पाडण्यांत आले. प्रिमेर ग्रावांत, लेखनवाचन, थोडें गणित, नीतीचे सामान्य नियम, ख्रिस्ती डॉक्रटीन व शिष्टाचार, व्याकरणाचे एक्झरसाईझीस् व प्रांतिक भूगोलाची व पोर्तुगीज इतिहासाची मूलतत्वे इतकाच अभ्यासक्रम होता. सेगंदग्रावांत या शिवाय भूगोलाची सामान्य माहिती, इतिहास व ख्रिस्ती पुराणे, रेषाचित्रकला, अंकगणीत व भूमिती यांचे व्यावहारिक हिशेबलेखनापुरतें ज्ञान इतक्या विषयांचा समावेश होई. नॉर्मल स्कुलचा अभ्यासक्रम दोन वर्षांचा करण्यांत येऊन त्यांत अक्षर वळविणे, रेषाचित्रकला, व्याकरणाचे सामान्य नियम, पोर्तुगीज व्याकरण, शिक्षणपद्धति व प्राथमिक शिक्षणविषयक कायद्यांचे ज्ञान; भूगोल, कालमापन व इतिहास; ख्रिस्ती डाक्टीन व पुराणे; अध्यात्मविद्या व नैतिक तत्वज्ञान; व अंकगणीत आणि भूमितीचें व्यावहारिक भूगोलापुरतें ज्ञान इतक्या विषयांचा समावेश झाला. नॉर्मलच्या पहिल्या वर्षाचे सर्टिफिकीट प्रिपेरग्रावाच्या शिक्षकांना व दुसऱ्या वर्षाचे सेगुंद ग्रावाच्या शिक्षकांना आवश्यक ठरविले होते. परंतु हा कायदा गोव्यांत अमलांत यावयाच्या पूर्वीच उभय ग्रांवांचे शिक्षण पुनः एकत्र करणारा व गव्हर्नरना हवी तेवढी स्कुले उघडण्याचा कुलमुखत्यारी देणारा दुसरा कायदा पोर्तुगालांत पास झाला. तथापि हे दोनहि कायदे १८५४ पर्यंत दप्तरातच पडून राहिले. दरम्यानच्या काळांत पणजी येथे एक मुलींची प्राथमिक शाळा मात्र स्थापन झाली. याच शाळेनें स्त्रीशिक्षणाचा गोव्यात प्रारंभ झाला. इ. स. १८५४ साली व्हिइकोंद द औरें या गव्हर्नरनें १८४४ च्या कायद्याची अंमलबजावणी करून नॉर्मल स्कूलची सुधारणा केली. सेगंद ग्रावाच्या पांच शाळा व मडगांव आणि म्हापशे येथे एक एक मुलींची शाळा उघडली. ३५ वर्षीचा आढावा-इ. स. १८७० ची स्थितिः-पस्तीस वर्षाच्या अवधींत साऱ्या गोमंतकांत निळून सरकारी प्राथमिक शाळांची संख्या ३७ झाली होती. शिवाय पारोकियाल शाळा ( चर्चच्या ) ७५ निराळ्याच होत्या. हिंदूचा वस्ती असलेल्या नव्या काविजादीत या एकंदर ११२ शाळांपैकी १२ सरकारी व ... ४ चर्चच्या भिळन केवळ १६ च शाळा होत्या ! : सरकारीरीत्या प्रसिद्ध झालला सेन्सस रिपोर्ट विश्वसनीय मानल्यास, १८७० साली, या ११२. शाळांतून ५८१९.... मुलगे व ३०५ मुली शिकत होत्या. म्हणजे ३८५ हज़ार लोकसंख्येतून ६.१२४०।