पान:गोमंतक परिचय.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ३० चरिष्ट सरकारांत तक्रारी केल्या होत्या. पारोकियाल शाळांतील शिक्षक स्वत:च अपु-या पोर्तुगीज शिक्षणाने युक्त होते. त्यामुळे इ. स. १८२३ त शिक्षणाची स्थिति असमाधानकारकच होती. सनदशीर राज्यपद्धतिः-इ. स. १८३१ त, पोर्तुगालांत सनदशीर राज्यपद्धति सुरू झाल्यानंतर व्हायसराय दों मानुएल द पोर्तुगाल यांनी शिक्षणाची पुनर्घटना केली व गोव्यांतील रायबंदर, पणजी, मडगांव, फोंडे, डिचोली व कोलबाळ अशा ६ शाळा स्थापन केल्या. प्रत्येक शाळेत दोनदोन शिक्षक असून एक रायबंदरची शाळा खेरीजकरून इतर शाळा त्यावेळी लष्करी छावण्यांच्या जागी म्हणूनच स्थापन करण्यांत आल्या होत्या. लेखनवाचन, वाक्यरचना, शुद्धलेखन, पोर्तुगीज इतिहास व लुझीयदश हे महाकाव्य टेक्स्ट बुकादाखल ठेवण्यांत आले होते. इ. सन १८३५ मध्ये पोर्तुगालांतील यादवी युद्ध थांबतांच गोमंतकांतील शिक्षण पूर्णपणे सरकारच्या हाती गेले व तेव्हांपासून प्राथमिक शिक्षणाचा कारभार पोर्तुगालांतील तत्सम शाळांप्रमाणे आजवर चालत आहे. ___ इ. स. १८४१ सांत अॅक्टिग गव्हर्नर लोपिश द लीम यांनी गोव्यांत एक मॉर्मल स्कूल व ४९ पोर्तुगीज प्राथमिक शाळा स्थापन केल्या. ११ तिसवाडी, १७ सासष्ट प्रांत व २१ बारदेश अशी त्यांची वांटणी झाली होती. डिचोली व कोलवाळ येथील शाळा बंद करून त्या ऐवजी ३ रेजिमेन्टल स्कुलें उघडली. या शाळा सुरू होतांच पारोकियाल शाळांतून पोर्तुगीज भाषा शिकण्याची बंदी झाली. नॉर्मल स्कूल आरंभी अगदीच तुटपुंज्या ज्ञानाच्या पायावर चालविले जात असे. ह्या शाळांचा बराच खर्च को मुनदादी व म्युनिसिपालिट्या यांच्यावर बसविला गेला होता. पढें कोंद द आंतश् या व्हायसरायानी कोमुनदादीनां व म्युनिसिपालिट्यांना हा खर्च झेपत नसल्याच्या सवयीने ह्यांपैकी तिसवाडी येथे ६, सासष्ट प्रांतांत ९ व बारदेशांत १० एकूण २५ शाळा राखून बाकीच्या बंद केल्या व नॉर्मल स्कूलासहित त्यांचा खर्च शैक्षणिक कराच्या उत्पन्नांतून व्हावा असें ठरविले. खेरीज नव्या काबिजादींमध्ये, पेडणे, डिचोली, सत्तर, फोंडे, जांबावली व काणकोण अशा सहा शाळा उघडून त्यांत ख्रिस्ती धर्मशिक्षणास फांटा दिला. पुढे १८४३ साली याच व्हायसरॉयने आणखी सात शाळा उघडल्या व त्यांतील ६ फोंडे व डिचोली या दोन महालांतून ठेविल्या.