पान:गोमंतक परिचय.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वे पोर्तुगीज प्राथमिक शिक्षणाची स्थित्यंतरें:-आपल्या आगमनानंतर पोर्तुगीजांनी लागलीच इकडे शिक्षणप्रसाराची जी खटपट केली, तिचे स्वरूप, निदान शतक दीड शतक तरी, केवळ धर्मप्रसाराच्या साधनाच्या दृष्टीनेच ठर-. विलेले होते. आलबुकेकनें नोकरवर्ग तयार करण्यासाठी पोर्तुगीज भाषेच्या पहिल्या शाळा, गोवा बेट व कोची येथे स्थापन केल्या होत्या खऱ्या, परंतु त्यांचे अस्तित्व कालोदरांत केव्हांच गडप होऊन गेले आणि गोवें घेऊन पंचवीस तीस वर्षे होतात न होतात तोच ह्या पोर्तुगीज शाळा व इतरत्र मिळणारे शिक्षणदेखील. पायांच्याच हातीं गेले. आणि त्यांच्याहि हातीं तें फार काळ न राहातां, मठवासी व कोंग्रेगानीदत जोग्यांच्या हाती उच्च शिक्षणाची सारी सूत्रे गेली. साक्षरताप्रसार हा चर्चच्या पायांच्याच देखरेखीखालीं पारोकियाळ शाळांमधून चालला होता. ह्या शाळा चर्चच्या उत्पन्नांतून चालत असून, त्यांत पोर्तुगीज लिपीतून लेखनवाचन व ख्रिस्ती धार्मिक गाणी म्हणतां येण्यापुरतें संगीतज्ञान, एवढाच शिक्षणक्रम असे. ह्या शाळा व्हायसराय दोजुवांव द कास्त्र याने इ. स. १५४५ त स्थापन केल्या होत्या. आजमितीस देखील प्रत्येक चर्चला जोडून ह्या शाळा कोंफ्रारीयश (चर्चच्या महाजन मंडळया ) व क्वचित् स्थळी कोमनदादीच्या पैशावर चालत आहेत. इ. स. १७७२ पर्यंत ह्याच शाळांतून पोर्तुगीज शिक्षणप्रसार चालत होता. त्या साली प्रसिद्ध मुत्सद्दी मार्केश द पोंबाल याने प्राथनिक पोर्त गीज शिक्षणासाठी गोव्याला दोन शिक्षक बहाल केले. आणि त्यांच्या व इतर शिक्षणाच्या खर्चासाठी, मांसावर रत्तली १ पै व दारूवर दर गोळ्यास ( चार शेरांस ) १० पै प्रमाणे कर बसविला या कराला सुब्सीदियु लितेरारियु (शैक्षणिक कर) असें नांव आहे. तेव्हापासूनच प्राथमिक शिक्षणांत राजसत्तेचा प्रत्यक्ष हात शिरला.. परंतु पोर्तुगीज राजकारणांतून पोंबालचे उच्चाटन होतांच ह्या शाळांकडचे सरकारचे लक्ष कमी होऊन त्यांची प्रगतीच खुंटली; पोंबालची सत्ता लयास गेल्यावर एकाच वर्षाने त्याने स्वतःच उत्पन्न केलेल्या 'रेयाल मेझ सेंसोरिय' ह्या बोडीने ह्या संस्था पाद्रींच्या हाती सोंपविल्या.आणि शैक्षणिक कराची स्थिति अशी झाली की, १७९७. पासून शिक्षकांचा पगार देखील त्यांतून भागेना. पुढे इ. स. १७९८ त व्हैग काब्राल व्हायसरॉयाने इतर खर्चापुढे ह्या शाळांची मातब्बरी न वाटल्यामुळे ह्या शाळा बंद केल्या. जवळ जवळ वीस वर्षे ह्या शाळा चालल्या होत्या. परंतु ह्या प्राथमिक शिक्षणापेक्षा, ल्याटिन व ख्रिस्ती धर्मशिक्षणच पाद्यांना जास्त जरूरीचे वाटत असल्याबद्दल, विशपनी व गव्हर्नरनी वारंवार