पान:गोमंतक परिचय.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- प्रकरण ६ वें . शैक्षणिक परिस्थिति. ___ विभाग पहिला. पोर्तुगीज प्राथमिक शिक्षण पोर्तुगीज पूर्व परिस्थितिः-पोर्तुगीजांच्या आगमनकालापूर्वी गोमंत-कांत शिक्षणाची स्थिति काय होती, हे समजण्याचे विश्वसनीय साधन तूर्त उपलब्ध नाही. परंतु अनुमानिक पुराव्यावरून एवढेच सांगतां येते की, निदान ब्राह्मणवर्ग व वैश्य वर्ग हा बराचसा साक्षर होता. काही ठिकाणी ही साक्षरता देवनागरी लिपीत तर काही ठिकाणी कानडी लिपीत ( जिला गोयकानडी असें नांव होते ) अशी होती. इतिहासकथनांत आपण पाहिलेच आहे की, इ. स. ११० पासून १३१४ पर्यंतच्या दीर्घ कालावधीत हा प्रदेश कदंबाच्या सत्तेखाली नांदत होता. परंतु सत्ता कोणाचीहि असली तरी कोमुनदादीच्या प्राबल्यामुळे अंतस्थ कारभार सारा कोमुनदादीच्याच हातांत होता. त्यामुळे साहजिकच गांवांतील शिक्षणाची बाजू नेहमी कोमनदादींच्या कुळकर्ष्याकडे असे. कंबरेला कलनदान, एका हातांत कोमुनदादींची चोपडी व दुसऱ्या हातांत लेखणी घेऊन कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, सोंधेकर, मुसलमान इत्यादि अनेक राजवटीत या वर्गानें, एका बाजूने वतने सांभाळतांना, दुसरीकडून भाषा राखण्याचा जो प्रयत्न केला, त्याला भाषांच्या इतिहासांत दुसरी तोड मिळणे कठीण आहे. जुन्या कुळकर्णी दप्तरांत असा एक कालखंड आहे की, ज्यांत कानडी लिपीत लिहिलेली देखील मराठी लिखाणे आहेत. देशभाषेच्या शिक्षणाविषयी पूर्वी चाललेले प्रयत्न पुढे मराठी शिक्षणाच्या विभागांत सांगण्यांत येतीलच. - विवेचनाच्या सोयीसाठी प्रस्तुत प्रकरणाचे पोर्तुगीज प्राथमिक शिक्षण, दुय्यम शिक्षण व उच्च व वैशेषिक शिक्षण असे आम्ही तीन विभाग केले आहेत. विवेचनासाठी आम्हांला जे ग्रंथ उपयोगी पडले त्यांत “ पोर्तुगीज हिंदुस्थानांतील प्राथमिक, दुय्यम व उच्च शिक्षणाची रूपरेषा” नांवाचा पाद्री फिलिप नेरी सौज यांचा १८७९ त प्रसिद्ध झालेला ग्रंथ सिन्योर लुईज दे मिनेजिस ब्रागांस यांचा १९२२ साली सरकारी रीतीनें प्रसिद्ध झालेला "पोर्तुगीज हिंदुस्थानांतील शिक्षण" जांवाचा ग्रंथ यांचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे.