पान:गोमंतक परिचय.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय २६ भरपाई कशी होते?-आयातनिर्गतींतील अंतराची भरपाई व ठेवीच्या रूपाने दिसून येणारी वचत, यांचा उगम शोधून काढावयाचा झाल्यास, गोव्यांतून परप्रांतांत किंवा परदेशी जाणाऱ्या लोकांकडेच धांव घेतली पाहिजे. बाहेर गेलेल्या गोमंतकीयांची संख्या सुमारे ७५ हजारांच्या जवळ असावी. शिरगणतीच्या रिपोर्टात याविषयीं जी माहिती आहे ती पुष्कळ अंशी चुकीची असण्याचा संभव असल्यावरून तिचा उल्लेख केला नाही. या मंडळीकडून येणाऱ्या पैशाने 'ओपीस' आणि 'मिझेरिकोर्द' या संस्थांच्या लॉटरीची जी तिकिटे बाहेर खपतात, त्यांतून येणाऱ्या पैशाने ही सारी बचत होते. या त्यांच्या परिश्रमाचा नक्की आंकडा मिळण्याचे साधन मिळणे अशक्य आहे. केवळ इन्शुअर्ड पत्रांतूनच, १९२७ सालीं ५५१५ हजार रुपये गोव्यात आले व ९६७ हजार रुपये गोव्यांतून बाहेर गेले. म्हणजे इन्शुअर्ड पत्रांतूनच नक्की ४५४८ हजार रुपये गोव्यांत आले. याशिवाय चेक, हुंड्या व रोकडीच्या रूपानेंहि गोव्यांत बाहेरचे पैसे येतात त्यांचा हिशेब मिळत नाही. त्याचप्रमाणे बाहेरच्या बँकांतून परभारे ठेवीच्या रूपाने पैसा सांठविला जातो, त्याचे व्याज इत्यादि साधनांनी आयात निर्गतींतील अंतराची भरपाई होत असते. राष्ट्रांतील संपत्ति अजमावण्याच्या अनेक साधनांपैकी विकाऊ जमिनीची किंमत, हे एक महत्त्वाचे साधन होय. याहि दृष्टीने विचार केल्यास, गोमंतकाची स्थिति समाधानकारकच आहे असे दिसून येते. ज्यांत रस्ते वगैरे वाहतुकीच्या साधनांची तादृश सोय नाहीं, आरोग्यरक्षण व सुरक्षिततेच्या बाबतींत जो भाग अजून मागसलेला आहे, अशी सह्याद्रीलगतची खेडी सोडून दिल्यास, नवीन काबिजादीतील इतर ठिकाणी, शेकडा पांच टक्कयांपेक्षा जास्त व्याज जमिनीच्या उत्पन्नाच्या रूपाने सुटत नसते. आणि जुन्या काबिजादींत हेच प्रमाणशेकडा दोहों इतकेंहि नसते. सारांश, बेकारी कमी, मजुरी चांगली, व्याजाचा दर कमी व जमिनीचे दर चढलेले अशा चिन्हांनी युक्त अशी गोमंतकाची परिस्थिति आहे. व तशी ती व्हावयाला मध्यम वर्गाचेच परिश्रम मुख्यत्वेकरून कारणीभूत झालेले आहेत. परदेशगमन व परप्रांतगमन करून, निढळाच्या घामाने बाहेरची संपत्ति गोव्यांत खेचून आणणारा असा वर्ग हाच होय. मात्र त्या मानाने त्यांचे जीवन तेवढे सुखाचे नसते ही मोठ्या खेदाची गोष्ट होय. प्रत्येक सांठविलेल्या रुपयामागे कितीतरी खस्त, किती तरी त्रास लपलेले असतात ! शिवाय रोगराईचा प्रसादहि याच वर्गाला विशेष स्वीकारावा लागतो तो निराळाच.. RRENT