पान:गोमंतक परिचय.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

' प्रकरण ५ वे १॥ रु. असे वाढलेले दिसतात. याशिवाय विमा कंपन्यांचें जें काम इकडे चाललेलें आहे त्यामुळे प्रिमिअमच्या रूपाने दरसाल सुमारे ८ लक्ष रुपयांवर रक्कम बाहेर जाते ती कायमची जाते असें म्हणावयाला हरकत नाही. कारण, विम्याच्या भरपायीबद्दल दरसाल जे ५०।७५ हजार रुपये मिळतात त्यांशिवाय मुद्दलाचा कांहींच पत्ता नसतो. अर्थात् ह्या रकमेवर दरसाल सुमारे ९। टक्के व्याज मात्र मिळतें असें सिद्ध झाले. आणि हा क्रम आज जवळ जवळ वीस वर्षे चालू आहे. बेकारीचे मानः-कोणत्याहि देशाच्या सांपत्तिक सुस्थितीचा विचार फरतांना त्यांतील बेकारीचे प्रमाण लक्षात घेतल्याशिवाय राहातां येत नाही. कारखान्यांवर व मोठमोठ्या उद्योगधंद्यांवर उपजीविका चाललेल्या व समाजांत लक्षाधीश व भिक्षाधीश असे दोनच वर्ग असलेल्या देशांची गोष्ट, जरा निराळी म्हणून सोडून दिली तर, इतरत्र बेकारीचें मान हे सांपत्तिक सुस्थितीचे महत्वाचे गमक समजले पाहिजे. गोमंतकांत बेकारी अगदीच नाहीं असें प्रस्तुत लेखकाला वाटते. आणि याची कारणे पुढे दिली जात आहेत. रेल्वेचे काम, माइनिंग कंपन्यांचे काम, आगबोटींवरील लोडिंग अन्लोडिंगचे काम, सरकारी रस्ते दुरुस्तीचे काम, ठिकाणदारांची जमिनीची मशागत इत्यादि कामें करावयाला इकडचे मजूर पुरे पडत नसल्याने मद्रास, धारवाड, इत्यादि प्रांतांतील मजूर व पठाण, मोपला, इत्यादि जातीचे मजूर गोमंतकांत बाहेरूनच आणवावे लागत आहेत, इतकेच नव्हे तर, देशांत कामाला मजुरांचा पडणारा तुटवडा नष्ट करण्यासाठी उपाययोजना म्हणूनच गोवा सरकारने गोव्याबाहेर जाणारांवर माणशी दहा आणे डोईपट्टी बसविली आहे. इतकेंहि असतां, सरकारी शिरगणतीच्या रिपोटीतील माहितीवरून गोमंतकांत १४५३९४ लोक निरुद्योगी म्हणून दिले आहेत. म्हणजे गोव्याच्या ४६९४९४ लोकसंख्येत जवळ जवळ एक तृतीयांश लोक बेकार ठरतात ! याचा उलगडा असा की,प्रत्यक्ष फेरीवाल्याचे किंवा इतर कामें करणाऱ्या स्त्रिया वगळल्यास इतर स्त्रीवर्ग शाळेत जाणारी मुलें खेरीजकरून बाकीची सारी मुलें, पुष्कळसे मजूर इत्यादि साराच वर्ग ह्या संख्येत सामावला गेला आहे. व अशा रीतीनें तो आंकडा तयार झाला आहे. व्याज कमी, मजुरी वाढलेली. मध्यमवर्गाचे प्राबल्य, इत्यादि लक्षणांत बेकारी संभवतच नाही व सर्वांत बलवत्तर प्रमाण म्हणजे इकडे कामाला हजारों मजूर बाहेरून आणावे लागतात हेच होय. गोव्यांतून परप्रांतीं जाणारे सुशिक्षित किंवा अशिक्षित लोक संपन्नतेच्या भजनीं लागून बाहेर जातात. म्हणून त्यांचा विचार बेकारांत जमेस धरता येत नाह