पान:गोमंतक परिचय.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण पहिले. तून पावसाळाभर मलेरियाची सांथ असते, त्या मानाने दर्याकांठचा प्रदेश व सपाट प्रदेश रोगरहित दिसतो. पिकेंः–सासष्ट, बारदेश व तिसवाडी हे कोंसेल्य व फोंडे कोंसेल्याचा अघशी नदीकडील भाग हे भाताच्या शेतीत उत्कृष्ट समजले जातात. बहुतेक साऱ्या जमिनींतून सर्द (खरीप ) व वाईंगण ( रब्बी ) अशी दोन पिके घेतली जातात. शिवाय रताळी, कलिंगडे, भेंड्या, मुळे, कांदे, इत्यादि वरपिकें, तिसवाडी व बारदेश या कोंसेल्यांतून काढण्यात येतात. नारळाचे उत्पन्न सर्व गोमंतकांत सारखेच येत असते. परंतु त्यांतल्या त्यांत पेडणे, बारदेश, तिसवाडी व काणकोण येथील नारळ खोबऱ्याच्या दृष्टीने विशेष उपयोगी समजला जातो. फोंडे कोसेल्य, सांखळीचा काही भाग व काणकोणचा थोडा भाग, यांत सुपारीचे पीक विशेष येते. सासष्ट, तिसवाडी व बारदेश येथे आंब्याचेंहि पीक चांगले येते. त्याच्या खालोखाल फोंडे, डिचोली वगैरे कोसेल्यांतहि आंबे होतात परंतु त्यांची रुचि तेवढी नसते असें म्हणतात. दरसाल निर्गतीस सुमारे दीड कोटी आंबे जातात. फोंडे कोंसेल्यांतून पावसाळ्याच्या सुरुवातीस बरीच अननसेंहि निर्गत होतात. कायसुवची नदी, बारदेश कोंसेल्यांतील बागची नदी नांवाचा लहानसा खारा ओढा, सिकेरीची लहानशी नदी, बेतुलची नदी व मांडवी नदीचा बराच मोठा भाग यांतून मिठागरें असून मिठाचें उत्कृष्ट पीक येते. गोव्यांतून दरसाल सुमारे पांच कोटी नारळ व १ कोटी मण मीठ निर्गत होते. ह्या पिकांखेरीज विशिष्ट पीक म्हणून बारदेशच्या मइडें गांवांतील मइंडोळी केळी फारच उत्कृष्ट व पौष्टिक समजली जातात. ___वाहतुकीची साधने:-याचे स्थूल मानाने लोहमार्ग, जलमार्ग व सडका असे तीन विभाग पाडावे लागतात. सर्वांत महत्वाचे साधन म्हणजे रेल्वेचे होय. सन १८८१ सालीं गोमंतकांत डब्ल्यु. आय. पी. रेल्वेच्या कामास ८० लाख पौंडांचे भांडवल घालून सुरुवात झाली. रेल्वे कंपनी इंग्रजी होती, तेव्हां त्या कंपनीचा पोर्तुगीज सरकारशी जो करार झाला त्यांत ह्या भांडवलावर पांच टक्के व्याजाची हमी पोर्तुगीज सरकारने स्वीकारली होती. परंतु पुढे दुधसागरच्या घाटांत बोगद्यांसाठी येत असलेला जबरदस्त खर्च पाहून व कदाचित् पुढे वाहतुक वाढल्यास डबल लाईन घालण्याची जरूरी उद्भवल्यास त्याचीहि सोय सुरुवातीसच करण्याचे ठरून बोगदे, कटिंगें, पुलांचे खांब इत्यादि कामें तेवढया रुंदीची मुळांतच बांधण्याची योजना झाली, तेव्हां मूळचे अंदाजपत्रक वाढवून दुरुस्त करण्यांत - - - -