पान:गोमंतक परिचय.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३ प्रकरण ५ . वरील कोष्टकावरून तर स्पष्ट दिसून येते की, १९०७ ते १९२.७च्या दरम्यान आयातीत भक्कम वाढ झालेली आहे. व १९१० सालच्या शिरगणतीपेक्षा १९२० साली लोकसंख्येत उलट १६२९०ची घटच झाली. असतांही आयातीतील वाढ झाली आहे. महायुद्धामुळे चलनी नाण्याच्या किंमतींत जगभर जो घोटाळा माजला होता त्यामुळे ही वाढ झाली असेंहि म्हणतां येत नाही. कारण झालेली वाढ केवळ किंमतींतच झाली नसून ऐन मालाच्या संख्येतच झाली आहे. यावर असेंहि म्हणता येईल की, गोमंतकांत या वीस वर्षांत उत्पन्नाची तूट झाली म्हणूनच आयात वाढली. परंतु तसें मुळीच झाले नाही. बाकी तें गृहित धरले तर त्यामुळे दिवाळे उलट जास्तच लवकर वाजावयाला पाहिजे होते. तें तर अजूनहि वाजलेले नाही. पुढे निर्गत व्यापाराचा विचार करतांना उत्पन्न मुळीच घटलें नाहीं हे सिद्ध होणारच आहे. शिवाय आयातीतील साखर, वस्त्र, जिन्नस, ग्यासलेट अशासारखे जिन्नस गोव्यांत मुळीं उत्पन्नच होत नाहीत. आणि त्यांची आयात देखील वाढली आहे. त्याचप्रमाणे आयातीत मोटार व पेट्रोलची भर पडलेली आहे हे वर सांगितलेच आहे. निर्गतीचे विवेचनः--निर्गतींतील महत्वाचे घटक म्हणजे नारळ, मीठ, आंबे, सपारी, मासे, खोबरें व काजूचे गर हे होत. या विषयींचे आंकडे दिलेलें कोष्टक पुढे दिले आहे. त्यावरून पाहाता, निर्गतीत घट तर झालीच नाही; पण उलट तीहि कितीतरी वाढलेलीच दिसून येते. आणि इतकेंहि जमेस धरून, एकदर आयातीचे एकंदर निर्गतीशी प्रमाण, गोमंतकाला नुकसानकारकच आहे हे तर आपण सुरवातीसच पाहिले आहे. शिवाय या बाबतीत दुसरीहि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, गोमंतकाच्या आकुंचित क्षेत्रामुळे असो, किंवा गोमंतकांत येऊन व्यापार करणाऱ्या परस्थ व्यापाऱ्यांच्या अस्तित्वामुळे असो, पण आयात-निर्गत व्यापाराची अखेरची सूत्रे बहुशः बाहेरच्याच व्यापाऱ्यांच्या हाती राहातात. नारळाचाच व्यापार घेतला, तर त्यासाठी परस्थ लिंगायत, गुजराथी व्यापाऱ्यांनी देखील इकडे पेढ्या घातलेल्या आहेत. तांदूळ, तंबाख, फळे, बस्त्र. जिन्नस इत्यादि विषयीं पाहिल्यास त्यांतही गोमंतकीयेतरांची बरीच मंडळी दिसते. आणि इतकेंहि असून आर्थिक बाबतींत गोमंतक दिवाळखोर बनला नाही. गोमंतकांत व्यापाऱ्यांची दिवाळींच वाजली नाहीत असे आमचे म्हणणे नाही. परंत आयातनिर्गतींतील फरकाच्या मानाने पाहिल्यास, ती जेवढी निघणे शक्य होते तेवढी तर असोच, पण त्यांच्या शतांश किंवा सहस्रांशानेही निघाली नाहीत.