पान:गोमंतक परिचय.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय २२ १९०९ ते १९२८ दरम्यानच्या वीस वर्षांच्या काळांतच, आयातीतच अडीच पटीचा वाढावा झाला आहे, तर निर्गतींत तो फरक दीडपटींतच झाला असून आजमितीस आयातनिर्गतींतील , फरकामुळे गोमंतकाला दरसाल समारे १ कोटि, वीस लक्ष रुपये बाहेर पाठवावे लागतात. तरी पण गोमंतकीय लोकांच्या, मुंबई वगैरे ठिकाणच्या बँकांतून लक्षावधि रुपयांच्या ठेवी अजनहि आहेत. इतकेच नव्हे, तर गोवा सरकारच्या पोस्टल सेव्हिंग बँकेचे २४२५ हजार रुपये, कर्ज मागणारे नसल्यामुळे, इतर बँकांतून ठेवीदाखल ठेवलेले आहेत. (V. Boletim da Agencia Geral das Colonias Vol V no 49 pg 272) हा चमत्कार होतो कसा, ते पुढे सांगण्यांत येईलच; पण अगोदर आपण आयातनिर्गतींतील महत्वाचे घटक कोणते ते पाहूं. आयातीचे घटकः-गोमंतकाच्या आयातीचे प्रमुख घटक म्हणजे, खाद्या जिन्नसांपैकीं तांदूळ व भात, गूळ, व साखर, वस्त्र, ग्यासलेट, आणि इतर चैनीच्या वस्तू होत. १९१९ सालापासून आयातीत दुसऱ्या दोन महत्त्वांच्या घटकांची भर पडलेली दिसून येते. हे घटक म्हणजे मोटारी व पेट्रोल हे होत. १९०७ १९२७. १९२८ | १९०७ ते १९२७. मधील फरक तांदूळ खंडी १२७ ह. १३१८ १२१ ह. २६१३ ३० ह. १७४८ २८ ३०६६ .८१ भात खंडी ९३२ ३५४ १२ १९५ ८४९ १०८८ ८७ ७२५ २१ २०७ २२७१ साखर मण ,, रुपये गूळ खंडी , रुपये वस्त्र रु. ग्यासलेट , रु. १७ २९ २९८ २५०७ १२ १११ १३९१ ७१७ ४२५ ३९७ पेट्रोल कीलोग्राम ४८९ س २३७ । ३१७ आंकडे हजारांचे आहेत