पान:गोमंतक परिचय.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ५ वें. आर्थिक परिस्थिति .... गोव्याची सांपत्तिक स्थितिः-अर्थ शास्त्रांत अशा एक नियम आहे की, ज्या देशाचा निर्गतव्यापार आयातीपेक्षा समृद्ध आहे तो देश समृद्ध व संपन्न समजावा. राजकीय सत्तेमुळे इतर देशांतून बलपूर्वक संपत्ति खेचून आणणाऱ्या इंग्लंडसारख्या देशांची बाब येथें विचाराला घ्यावयाची नाही. दुसरी अगदी आधुनिक कसोटी म्हणजे देशांतील बेकारीचे प्रमाण व व्याजाचा दर ही होय. ज्या देशांत हे प्रमाण कमी असेल तो देश संपन्न व जेथे हे प्रमाण जास्त असेल तो देश आर्थिक दृष्टया खालावलेला समजावयाचा. तिसरी कसोटी म्हणजे मजरीचे प्रमाण हे जेथे जास्त असेल तेथें संपन्नावस्था नांदते असे समजतात. गोमंतक प्रांत पहिल्या कसोटीने पाहिल्यास अत्यंत हलाखीचा समजला पाहिजे. परंतु पुढील दोन प्रमाणे जर त्याला लावून पाहिली तर मात्र प्रकार निराळ्याच स्वरूपांत दिसतो. प्रस्तुत प्रकरणांत ही तीनही प्रमाणे विचारांत घेऊन गोव्याच्या सांपत्तिक स्थितीचा विचार करावयाचा आहे. आणि तो करतांना होता होईतों अधिकृत अशा सरकारी, जकात खातें, पोस्ट खातें, जमाबंदी खातें इत्यादि खात्यांतील आकड्यांनीच तो करणार आहों. आयात व निर्गत व्यापारः-ह्या तुलनेसाठी १९०९ हे साल व १९२८, ही दोन सालें विचारांत घ्यावयाची आहेत. पुढील कोष्टकांत ही माहिती दिली आहे. आंकडे हजाराचे आहेत. साल. १९०९ | १९२८ । वाढावा वाढाव्याचे शेकडा वा प्रमाण आयात | ६३६४ | १६४३२ | १००६८ २५८ टक्के निगत २८८५ । ४५११ । १६२६ त्यांतील फरक ३४७९ | ११९२१/ ८४४२ । ३४२ " निर्गतीचे आयातीशी |३७,७६ | २७,४५ प्रमाण माण गोव्याच्या आयातीशी शेकडा प्रमाण किंवा उभय आंकड्यांमधील फरक पाहिल्यास गोवाप्रांत इतक्या वर्षीच्या अवधींत बाहेरील सावकारांच्या आहार केव्हांच पडला पाहिजे होता. पण तसा तो पडलेला अजून दिसून येत नाही.