पान:गोमंतक परिचय.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय २० डॉक्टर पुरुषोत्तम वामन शिरगांवकरः हेहि माध्वसंप्रदायी गौडसारस्वत ब्राह्मणांतीलच होते. सांखळी कोंसेल्यांतील शिरगांवच्या कोमुनदादीचे ते गांवकर होते. ते हॉस्पिटल असिस्टंटची परीक्षा पास झाले होतेबेळगांव येथे आपल्या बंधकडे (प. वा. डॉ. विष्णु वामन शिरगांवकर ) ते प्रारंभी होते; पण इ. स. १८९६ च्या सुमारास ते गोव्यांत आले व पढे त्यांचे सारे कार्यक्षेत्र गोमंतकच बनले. १९०५ ते १९१५ पर्यंतच्या गोमंतकांतील हिंदूंच्या साऱ्या चळवळींशी डॉक्टरसाहेबांचें नांव निगडित झाले आहे. त्यांचा स्वभाव पराकाष्ठेचा निगर्वी व प्रेमळ होता. व त्यामुळे त्यांचा परोपकारहिं मोठा होता. पणजीत त्यांची डॉक्टरीमदत न मिळविलेला इसम विरळाच सांपडेल.. 'विद्यार्थ्यांवर त्यांचे फार प्रेम असे. गोमंतकीयेतरांना मडगांवला जसें सुब्राव नाईक यांचे घर होते तसेंच पणजीला डॉक्टरसाहेबांचे घर असे. प्रस्तुत लेखकाला त्यांच्या सहवासाचा लाभ बराच काळ मिळाला. होता. गोमंतकीय हिंदूंच्या उन्नतीसाठी. त्यांचा जीव तिळतिळ तुटत होता. इ. स. १९१८ साली बेकनहल्ली ( बेळगांव ) मुक्कामी त्यांना क्षयाने देवाज्ञा झाली. त्यांच्या निधनानिमित्य पणजीचा बाजार -स्वयंस्फूर्तीने बंद झाला होता. प्रभात ' नांवाचें वर्तमानपत्र त्यांनीच काढले होते.. पांडुरंग सदाशिव दणाईतः-हे म्हापसे येथील प्रसिद्ध दणाईत घरांण्यांतील स्मार्तसंप्रदायी गौडसारस्वत ब्राह्मण होत. गोमंतकांतील प्रमुख पुढाऱ्यापैकी हे एक होते. म्हापशेंच्या संयुक्त गौडसारस्वतब्राह्मणपरिषदेचे ते सेक्रेटरी होते. परिषदेमार्फत म्हापशांत स्थापन झालेलें सारस्वतविद्यालय यांच्याच देखरेखीखाली चालत होते. त्यांनी आपले पुढचें सारें आयुष्य त्या विद्यालयालाच वाहिले होते. गोवापंच हे वर्तमानपत्र त्यांच्या मदतीने चालत होते. त्यांच्या मृत्यूने गोमंतकांतील प्रमुखत्वें म्हापशांतील चळवळींची बरीच हानि झाली. इ. स.. १९२७ साली त्यांना जलोदराच्या विकाराने देवाज्ञा झाली. _गोमंतकीय ग्रंथकार वगैरे वाङ्मयसेवकांची माहिती वाङ्मयसेवा-प्रकरणांत पुढे येणार असल्यामुळे तिचा केवळ उल्लेख करून हे प्रकरण संपवीत. आहो...