पान:गोमंतक परिचय.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ४थ त्यावेळच्या मंबईच्या प्रख्यात डॉक्टरांत यांची गणना होत होती. इ. स. १८८४ साली त्यांना देवाज्ञा झाली. हे गौ. सा. ब्रा. होत. सूर्याजी आनंदराव देशपांडे:-हे स्मार्तसांप्रदायी गौडसारस्वत ब्राह्मण पणजीचे रहिवासी असून यांचा जन्म १८२८ त झाला. मराठीच्या अध्यापकाचें -काम त्यांनी ३८ वर्षे केलें व तेथून रिटायर झाल्यानंतर सरकारने १८८५ साली त्यांना रैतोर नेमलें; पण या जागेचा लाभ त्यांना फार काळ मिळाला नाही. १८८८ त ते निधन पावले. मराठीपोर्तुगीज व्याकरण व सुमारे ५३ हजारांवर शब्दसंख्या असलेला मराठीपोर्तुगीज कोश हे ग्रंथ त्यांच्या परिश्रमाचें व विद्वत्तेचे प्रमाणच आहेत. हा कोश सरकारने घेऊन छापला आहे. सांप्रत त्याच्या प्रती दुर्मीळ आहेत. भिषग्वर पांडुरंग रामचंद्र वैद्यः-हे केरीचे पद्ये ब्राह्मण. प्रसिद्ध वैद्य होते. यांचे घराणे आर्यवैद्यकांत बरेंच नावाजलेले आहे. गोरगरीबांसच नव्हे तर दाराशी येणाऱ्या सर्व रोग्यांना यांच्याकडून औषधोपचाराची मदत बिन मोबदला होत असे. यांचें नांव अजूनहि. गोमंतकांत फार प्रसिद्ध आहे. जन्म १८३४निधन १९०२. भिषग्वर सब्राव लक्ष्मण नायक हे माध्वसंप्रदायी गौड सारस्वत ब्राह्मणा. मडगांवच्या सुप्रसिद्ध शंखावलीकर घराण्यांतील गृहस्थ. इ. स. १८५५ च्या समारास जन्मले. आयवैद्यकसंस्कृतभाषा व जवाहिराची परीक्षा यांत ते निष्णात होते. हे अत्यंत परोपकारी होते. मडगांवांत येणाऱ्या गोमंतकीयेतरांस "सब्राव नाईक का घर" म्हणजे आश्रयस्थानच होते. श्रीमद्विवेकानंद स्वामी गोमंतकांत आल्या वेळी त्यांच्यांच येथे होते. व्यवहारांत यांचा हातखंडा होता. १९११ साली त्यांनी संन्यासदीक्षा घेतली होती; परंतु श्रीसुब्रह्मण्यानंदतीर्थ या नांवाने समाजांत वावरत असतांनाहि त्यांनी आपलें परोपकाराचें व्रत सोडले नाही. इ. स. १९१९ त ते समाधिस्थ झाले. त्यांनी आपल्या मागें वैद्यकींत बरेच शिष्य तयार केले आहेत. भिषग्वर त्रिविक्रम रामचंद्र प्रभू लंवदेः-ज्ञात गौ. सा. ब्रा. माध्वसंप्रदायी. हेहि गोमंतकांत आर्यवैद्यकांत नाणावलेले होते. यांचा जन्म रायबंदर येथे झाला. त्यांचे रोगनिदान-नाडीज्ञान अचूक असे. स्वभावाने ते अत्यंत निस्पृह होते. शके १८३९ आषाढ शु. ११ सीस त्यांनी आपली देहयात्रा संपविली.