पान:गोमंतक परिचय.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय देखील नेमलें होतें. हिंदु लोकांना राजकीय हक्क मिळण्याकरितां यांनी पुष्कळ खटपट केली होती. १८५७ त पडलेल्या दुष्काळांत यांनी हजारों रुपयांचे धान्य आणून लोकांना कमी दराने दिले होते. मनुस्मृतीवर हल्ला करणाऱ्या पोर्तुगीजांना यांनी पोर्तुगीज भाषेत जबाब देऊन निरुत्तर केले होते. सरकारने यांना 'व्यारन' व "व्हिश्कोंद" या पदव्याहि दिल्या होत्या. इ. स. १८७४ च्या जुलैंत यांचे देहावसान झाले.यांचे घराणे आजमितीसहि गोमंतकांत पिढीजाद श्रीमंत म्हणून ओळखले जाते. गोविंद नारायण माडगांवकरः-यांचा जन्म जुन्या गोव्याजवळच्या पेरी येथे १८१५ त झाला. हे विल्सन हायस्कुलांत हेड मास्तर होते. डॉ. भाऊदाजी, नामदार नारायण वा. दाभोळकर इत्यादि यांचेच शिष्य होते. यांनी सृष्टीतील चमत्कार, मुंबईचे वर्णन, उद्भिज्ज पदार्थविज्ञान इ० ग्रंथ लिहिले आहेत. त्यांची भाषाशैली शुद्ध, सरळ व गोड होती. यांचा मृत्यू, इ. स. १८६५ मार्च १५ ला झाला. । डॉक्टर भाऊदाजी लाडः-गौ. सा. बा. मांद्रे येथे इ.स.१८२२ त यांचा जन्म झाला. मूळ पारसे गांवचे होत. मुंबईतील हे फारच कुशल वैद्य होते. यांचें रक्तपितीवरील औषध युरोपांतहि प्रसिद्ध झाले होते. इतिहासाच्या आद्य संशोधकांपैकी हे एक प्रख्यात संशोधक होते. मंबईच्या शेरिफचा मान एतद्देशीयांत पहिल्याने यांनांच मिळाला होता. ता. ३१ मे इ. स.१८७४ रोजी यांचे देहावसान झाले.यांच्या अंगच्या अनेक गुण समुच्चयामुळे यांना मुंबईत “ अवंतीचा भोज" अशी संज्ञा होती. माधव चंद्रोवा कलेः-यांचे जन्मस्थान बारदेशांतील कळंगुट गांव होय. इ.स.१८२५ साली त्यांचा जन्म झाला. उपजीविकेसाठी त्यांनी कारकुनी पतकरून इंदूर,कराची,वगैरे ठिकाणी प्रवास केला होता. हे फार मानी होते. यांचे 'शब्दसंग्रह' हे मासिक म्हणजे जुन्या संस्कृत कवींच्या अप्रकाशित काव्यांचा संग्रह होता. त्याचप्रमाणे ' शब्दरत्नाकर' नावाचा एक मोठा संस्कृत मराठी कोशहि यांनी प्रसिद्ध केला होता. इ.स.१८८५च्या डिसेंबर महिन्यांत यांचे निधन झाले.अनंत चंद्रोबा डुकले हे उपरोक्त माधव चंद्रोबांचे धाकटे बंधु होते. कंळगुट येथेच त्यांचा जन्म इ. स. १८२९ त झाला. वयाच्या २२ व्या वर्षी डॉक्टरीची परीक्षा पास होऊन त्यांनी इंदूरच्या फलटणीत नोकरी धरली; परंतु यांचे खरें कार्य मुंबईत देवी टोचण्याच्या प्रयत्नांत दिसून आले. यांनां सिंधी व फारशी या भाषा येत होत्या. वडील बंधु माधव चंद्रोबांच्या 'सर्व संग्रहा'स यांचे मोठे साह्य होते.