पान:गोमंतक परिचय.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ४ थे गीज सरकारने १७९२ त तेंच वकिलीचे काम दिले होते. · तूर्त त्यांचे वंशज कुंभारजुवें येथे असतात. हे गौ. सा. बा. होत. विठ्ठल गोरक्षराव वर्दे वालावलीकरः-हे गृहस्थहि इ. स. १७९३ सालापासून पेशव्यांचे दरबारी वकील होते. ज्ञात गौ. सा. बा. यांच्या वजनामुळेच हिंदूंवरील पाद्रीशाहीचा जुलूम मंदावला होता. ह्यांचा जन्म इ. स. १७३१मध्ये जवें बेटांत झाला होता. नवीन काबिजादीतील हिंदूंनां आपल्या रीतरिवाजरक्षणाची जी सनद मिळाली होती ती यांच्याच सल्ल्यामुळे पोर्तुगीज सरकारने दिली होती. इतकेच नव्हे तर त्या सनदेचा मसुदा देखील विठ्ठलरावांच्याच हातचा होता. १७५४ साली पोर्तुगीज सरकारने त्यांना कॅप्टनचा हुद्दा देऊन शेवटी पेशव्यांच्या दरबारी वकील नेमले. इ. स. १८०८ साली त्यांचे देहावसान झाले. मुंबईचे श्री. वामनराव र. वर्दै वालावलीकर हे प्रसिद्ध लेखक व कोंकणीचे अभिमानी, यांचेच वंशज होत. बक्षिबहादर जिवबादादा केरकरः-यांचा जन्म पेडण्यांतील केरी गांवीं इ. स. १७४० त झाला. पानिपतच्या घनघोर संग्रामापासून खडांच्या लढाईपर्यंतच्या एकंदर संग्रामांत शिंद्यांच्या सैन्यांत राहून जिवबादादांनी तलवार गाजविली आहे. शिंद्यांच्या इतिहासांतच नव्हे तर मराठ्यांच्या उत्तरेकडील इतिहासांत बक्षिबहाद्दरांचें नांव इतकें प्रख्यात आहे की, ते वगळल्यास इतिहासच लंगडा होईल हे इतिहासज्ञांस सांगावयाला नको. ता. ६ जानेवारी इ. स. १७९६ रोजी त्यांचे देहावसान जांबगांव मुक्कामी झाले. त्यांच्या मागून त्यांचे बंध जगोबादादा, पुत्र, चुलत बंधु वगैरे केरकर बरेच प्रसिद्धि पावले होते. तत त्यांचे वंशज केरी मुक्कामी असतात. ज्ञात गौ. सा. ब्राह्मण. लखबादादा लाड:-हेही गृहस्थ मूळचे बारदेशांतील चिखली गांवचे असन जिवषादादांचे समकालीन होते. तत्कालीन राजकारणांत ते प्रख्यात मुत्सद्दी गणले. जात. शिंद्यांच्या सैन्यांत यांच्याकडे तोफखान्याचा अधिकार होता. पुष्कळ लढायांत त्यांनी भाग घेतला होता. आग्र्याच्या किल्ल्याच्या वेढयांत त्यांनी मोठी मर्दमकी दाखविली होती. ता. २७ जानेवारी इ. स. १८०३ रोजी सालेबर मक्कामी त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या मृत्यूनंतर शिंदेशाहीस सारखी उतरती कळा लागली. यांचे वंशज चिखली व आरोबा येथे आहेत. ज्ञातीने गौ. सा. बा. होत. परुषोत्तम बाबन केंकरेः-गौ. सा. ब्राह्मण. यांचा जन्म कुंभारजवें येथे इ. स. १८१२ त झाला. यांनां पोर्तुगीज सरकारने तत्कालीन कौन्सिलचे सभासद