पान:गोमंतक परिचय.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय परदेशी मोहक कपड्याच्या, लेस वगैरे लावलेल्या चोळ्याहि काही दिसतात. केशरचनेतील मूळच्या तंग ताणून बांधलेल्या वेण्या, दक्षिणीब्राह्मणांतच मात्र दिसतात. इतर वर्गातून त्याऐवजी बुचड्याची चाल रूढ होऊन आजला त्याची मजल सैल बचडा व थोड्याशा तिरप्या भांगापर्यंत आली आहे. जपानी आंबाडा वगैरे पद्धति अजून आली नाही,त्याचप्रमाणे लेडी फॅशनच्या छोट्या छत्रीचा वापर अजून नाही. स्मार्त गौ. सा. बा. स्त्रीवर्गात आडवें लांबट कुंकू लावण्याचा जुना प्रघात आहे व वैष्णव वर्गात उभ्याचा प्रघात आहे. प्रसिद्ध पुरुषः-ह्या सदरांत पोर्तुगीज पूर्वकालीन पुरुषांची माहिती देण्याजोगी माहिती लेखकाला मिळाली नाही. तरीपण जी तुटपुंजी सामुग्री त्याला मिळाली आहे तींतूनच खालील माहिती देण्यात येत आहे. रामकृष्ण शेणवी घोडेकरः-हे गृहस्थ अव्वळ बाटाबाटीच्या काळी म्हणजे सुमारे इ. स. १७०० च्या सुमारास कुंभारजव्यांत होऊन गेले. हे पोर्तुगीज उत्तम प्रकारेंजाणत होते. व तत्कालीन जुलुमास आळा घालण्याचे प्रयत्न करून त्यांनी एक दोन व्हायसरायांना बडतर्फ करविलेंहि होते. इ. स. १७३३ जुलै ११ रोजी तत्कालीन पोर्तुगीजांनी शिद्दी मारेकऱ्यांकडून त्यांचा खून करविला. महेश्वर रामचंद्र भट्ट सुखठणकर:-या महापंडितांचें नांव हिंदुस्थानांत प्रख्यातआहे. यांचा जन्म इ. स. १७१९ त महाशेल ( माशेल ) या गांवी झाला. यांचें सारे शिक्षण गोमांतकांतच झाले होते. संस्कृत भाषेवर यांचे असामान्य प्रभुत्व होते. विशेषत: अभिधान ग्रंथ म्हणजे कोश यामध्ये त्यांनी विश्वप्रकाश नांवाचा अनेकार्थ कोश, एकाक्षरी कोश इत्यादि कोश रचून फारच भर घातली. अमरविवेक ही अमरकोशावरील टीका विद्वन्मान्य आहे. याशिवाय बऱ्याच टीका त्यांनी लिहिल्या असून त्यांचे अप्रकाशित असे आणखीहि ग्रंथ होते असे म्हणतात. देहावसानसमयी त्यांचे वय ९८ वर्षांचे होतें ! थेट काशीचे पंडितहि ज्ञानसंपादनार्थ त्यांच्याकडे येत अशी त्यांची विद्वत्ता दांडगी होती. इ. स. १८१७ त ते कैलासवासी झाले.जातीने गौ. सा. बा. होते. नारायण विठ्ठल शेणवी धुमेः-होहे कुंभारजुव्याचेच गृहस्थ असून ते इ. स. १७७६ पासून १७९२ पयत पेशव्यांच्या दरबारी पोर्तुगीज वकील होते. इ. स. १७८६ साली उभय सरकारांत त्यांनी तुल्यारिमित्र संधिहि घडवून आणला होता. त्यांच्या मागून त्यांचे पुत्र विठ्ठल नारायण शेणवी धुमे यांनांहि पोर्तु