पान:गोमंतक परिचय.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ४ थे स्वतःच्या नैतिक बाजूवर डाग लावून घेतल्याचा असे दोन आरोप येतात. ज्या पूर्वयुगांत, त्या समाजाकडे गायनकलेची उपासना व तदनुषंगिकच, देवसेवेच्या निमित्ताने अभिजात समाजाच्या विवाह-संस्थेचे पावित्र्यरक्षणार्थ, अपवित्र धंद्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, तें युग कालाच्या धुक्यांत दिसेनासे झाले आहे. त्या वेळच्या समाज नेत्यांना ही योजना करण्यासाठी कदाचित् कारणेहि तशीच बलवत्तर असतील. इतकेच नव्हे, तर ह्या उभय धंद्यापासून उपरोक्त गायक समाजाचे हित देखील साधले असेल; म्हणून आजच्या या “नदायत्तं तु पौरुषम् "च्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या काळांत, ही पूर्वयुगीन परिस्थिति आहे तशीच राखं पाहाणे म्हणजे केवळ तातस्य कूपोय मिति... सारखेच आहे. बाकी ही परिस्थिति गोमांतकांतून बदलत जाऊन तिचे केंद्रस्थान मुंबईसारखें सुधारणेचे आगर व इतर धनकनकसंपन्न शहरें झाली. हल्लीच कुठे मुंबईत याबावतीत सुधारणेचे उपाय व कायद्याची कलमें पास होऊ लागली आहेत. पोषाखः-गोमंतकीय हिंदूंच्या पोषाखांत परस्थ इसमाला विलक्षण वाटणारा विशेष म्हणजे तांबड्या मखमालीची टोपी होय. परंतु त्या टोपीलाहि इतिहास आहे. धार्मिक जुलमांच्या काळी जुन्या काबिजादींतील हिंदुवर्गाला पाद्रीशाहीच्या जबरदस्तीमुळे, भूळचा रुमाल किंवा मुंडासे टाकून काळ्या मखमालीची टोपी घालावी लागली. पुढे काळ्या टोपीएवजी तांबडी घातली तरी पायांची हरकत होईनासी दिसतांच, आमच्या सासष्ट, बारदेश व तिसवाडी प्रांतांतील हिंदूंनीं तो प्रघात पाडला. आणि होतां होतां मुळच्या त्याच जलमाच्या चिन्हाला शिष्टसंमत रूप येऊन तिचाच प्रसार झाला. गेल्या शतकांत प्रतिष्ठित वर्गाचा पोषाख म्हणजे, चुण्यांचा अंगरखा, मुंडासे किंवा फणीचा रुमाल असा होता. पुढे त्यांची जागा अनुक्रमें पारशी किंवा शॉर्टकोट, पुणेरी पगडी व जरी रुमालांनी घेतली. आणि आतांशा टोपीवाल्यांच्या अमदानींत टोप्या व रेशमी कोशा आणि केवळ समारंभाच्याच प्रसंगी पुणेरी झिळमिळ्यांच्या पगडीने ती घेतली आहे. तांबडी टोपी आतांशा वापरांतून जाऊ लागली आहे. अनवाणी चालण्याचा प्रघात अभिजात वर्गात मुळीच नाही. स्त्रियांचा पोषाख अजून फारसा बदलला नाही. चोळीलुगड्याचे साम्राज्य स्त्रीवर्गात अजन अबाधित असेंच आहे. पोलकी व ब्लाउझ यांचा प्रवेश बालावर्गापरताच मर्यादित आहे. घरगुती वापरांत लुगड्याऐवजी परदेशी पातळे व खणाच्या चोळीऐवजी