पान:गोमंतक परिचय.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय जातात. ह्या पुलाचे दृश्य फारच मनोहर दिसते. मांडवी नदीचा फांटा हिला मडकईजवळ मिळतो. तेथें हिचे पात्र सुमारे पाऊण मैल रुंदीचे बनले असून उत्तरोत्तर विशेषच रुंद होत, मुरगांवच्या समोर त्याला अडीच तीन मैलांची रुंदी प्राप्त होते. दरम्यान कुठाळ बंदरासमोरच उदरांचे बेट या नांवाचें व दाबोली गांवासमोर सां जासींत नांवाचे अशी दोन बेटेंहि या नदीत आहेत. पारोडेंची कशावती नदी ही एक व सांतानची नदी दुसरी ह्या हिलाच मिळतात. माशेलांतील नदी नांवाचा मांडवीचा जो फांटा हिला मिळतो, त्यावर श्री मंगेशीस जाण्यास उपयोगी पडणारे कुंडई बंदर आहे. पारोड्याच्या नदीवरहि रेल्वेचा लोखंडी पूल चांदर येथे आहे. बेतुलची नदी ऊर्फ मिठाची नदीः-ही सासष्ट प्रांतांत वेणे गावाजवळ उगम पावून सासष्टप्रांत दक्षिणोत्तर उभाच चिरून बेतूल व केळशी गांवामध्ये समुद्रास मिळते. बेतूलचे बंदर याच नदीच्या मुखाशी असून त्या बंदरांतून बराच व्यापार चालतो. तर्पणची नदी: ही काणकोण कोंसेल्यांतील आंबेघाटांत उगम पावून तर्पणबंदराजवळ समुद्रास मिळते. तर्पण येथें हिचे पात्र बरेंच रुंद झाले असून तेथे व्यापारी फत्तेमाऱ्या येतात. ___गाल्जीबागची नदीः ही देखील काणकोण महालांतच आंबे घाटाच्या एका फाट्यांत उगम पावते व गाल्जीबाग येथे समुद्रास मिळते.. हवापाणी:-डोंगराळ मुलुख व सपाट प्रदेश असे दोन विभाग स्थूल मानाने होतात, असे आम्ही पूर्वी सांगितलेच आहे. त्याच मानानें गोमंतकाचे हवापाण्यासंबंधानेंहि दोन विभाग पाडतां येतात. सामान्यतः गोमांतकांतील हवा नेहमी उष्ण व सर्द असते. जून ते सप्टेंबरपर्यंत झडीचा पाऊस असतो. त्याचे प्रमाण सरासरी २८७९ मिलीमिटर ( जवळ जवळ १०५ इंच ) आहे. अक्टोबर महिनाभर कडाक्याचा उन्हाळा असून अधून मधून पावसाच्या सरी येतच असतात. नवंबर ते जानेवारीपर्यंत हवा साधारणपणे गार असते. याच वेळी उत्तरीय वारा सुरू होऊन अंगाला झोंबत असतो. फेब्रुवारीपासून पुनः उन्हाळ्यास सुरुवात होऊन मे महिन्यांत उष्णतेची परमावधी होते. या वेळी पारा जास्तीत जास्ती ९१ पर्यंत चढतो व हिवाळ्यांत व पावसाळ्यांत ७० पर्यंत उतरलेला दिसतो. समुद्रकांठच्या प्रांतांतून ह्या उष्णतामानांत थोडा फार फेरफार दिसून येतो व तेथील हवा कमी उष्ण असते. डोंगराळ प्रांतांतून व तिसवाडीच्या काही भागां