पान:गोमंतक परिचय.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय पडली आहे. शुद्धीकृतांना देवालयप्रवेशाची सवलत, त्यांच्या पौरोहित्याची व्यवस्था, सारांश आलेल्या हरएक अडचणींत त्यांना मदत करावयाला गोमंतकीय हिंदुसमाज, आपापसांतील इतर भेदाभेद विसरून,अहमहमिकेनें व अंत: स्फूर्तीने पुढे आल्यामुळे ही शुद्धि शक्य झाली. हा पाया नसता तर... पण सांप्रत ह्या ताज्या प्रकरणाविषयी एवढाच उल्लेख पुरे. तिसरा महत्वाचा विशेष म्हणजे त्यांचा पराकाष्टेचा प्रांताभिमान, होय. प्रांताभिमानामुळेच त्यांनी वर सांगितलेल्या चळवळी, मग त्या ज्ञातिसंस्थेच्या पायावरच का असेनात, पण जातिद्वेषाशिवाय चालविल्या आहेत. अखिल गोमंतकाच्या इभ्रतीचा प्रश्न येतांच आम्ही आपापसांतले सारे भेदाभेद व वैयक्तिक मांडणेहि विसरून एकत्र होतो. चवथा महत्वाचा विशेष म्हणजे गृहस्थाश्रमाची मर्यादा पाळण्याचा त्यांचा पराकाष्टेचा प्रयत्न होय. ह्या मर्यादेचा विचार नैतिक व आर्थिक अशा दोन बाजूंनी करता येईल.नैतिक बाजूने पाहिल्यास पूर्वीचा एखादा व्यसनप्रिय, जुगारी, बाहेरख्याली किंवा तंटेवाज गोवेकर आज अपवा दात्मक स्वरूपानें, केवळ एखाद्या पुराण वस्तूसारखाच, कोठे तरी दिसत असतो. पण त्याला समाजांत बिलकूल दर्जा नसतो. आणि आर्थिकदृष्ट्या सांगावयाचे झाल्यास आतिथ्यशीलतेंत गोमंतकीय इसम, मग तो कोणत्याहि दर्जाचा किंवा जातीचा का असेना, इतर कोणत्याहि समाजाला हार जावयाचा नाही. मागे सांगितल्याप्रमाणे गोमंतकीय हिंदूंची आर्थिक स्थिति, वाढत्या मजूरीच्या व गरजांच्या ह्या काळांत,बरीच ओढगस्तीची बनली आहे.पूर्वी चांगल्या संपन्न स्थितीत असलेली कुटुंबें देखील, आपला गतकालीन रुबाब व दर्जा राखतां न आल्यामुळे आजला आपल्या जमाखांचा कसा तरी मेळ घालण्यांत चूर झालेली दिसतात. तरी देखील त्यांची मूळची हाडीमासी खिळलेली आतिथ्यशीलता त्यांत दिसून येतेच. या त्यांच्या गुणामुळेच गोमंतकांत औषधाला देखील हिंदु भिक्षेकरी मिळणे कठीण झाले आहे, याचा प्रस्तुत लेखकाला पराकाष्ठेचा अभिमान वाटतो. कित्येकदां तर ही आतिथ्यशीलताच आमच्याविषयी निरनिराळे गैरसमज, थट्टा, प्रस्तुत व्हावयाला कारणीभूत झालेली दिसते. प्रसंगी स्वतःचे महत्त्वाचे काम देखील क्षणभर बाजूला सारून पाहुण्यांच्या व्यवस्थेसाठी खपणारा गृहस्थ हिंदुसमाजांत अगदी सामान्य चीज आहे. ___ गृहस्थाश्रमाच्या मर्यादेविषयी विचार करतांना तो दोन प्रकारे करावा लागतो. त्यांपैकी नैतिक दृष्टीने पाहातां गोमंतकीय हिंदु समाजावर मराठा गायक समाजासारख्या जाती इकडे देवळांतून बद्धमूल करून ठेविल्याचा व तशा त्या राहिल्याने