पान:गोमंतक परिचय.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ४ थें ळदां मतविरोध झाला असला, तरी संघाचा एक सामान्य शिपाईं असें म्हणवून घेण्यांत त्याला भूषणच वाटते. कारण हिंदुसमाजाच्या हिताचा प्रश्न येतांच मतामतांचा गलबला, वैयक्तिक हितसंबंध, शत्रुत्व किंवा मैत्री इत्यादि चटसाऱ्या बाबींना बाजूस सारून आजवर तरी संघाने अभेद्य एकी प्रकट केली आहे. गोमंतकीय हिंदु सुशिक्षितांना संघाबाहेर राहाण्यास जागाच मिळू नये इतकें व्यापक व सर्वगामी स्वरूप आज तरी संघाला प्राप्त झाले आहे. स्वभावविशेष:-येथील गौड सारस्वतब्राह्मण वर्ग हा जात्याच बुद्धिमान व कर्तबगार आहे. पोर्तुगीजांच्या अव्वल जुलुमांचा, अंगावर शहारे आणणारा पहिला धक्का, याच समाजाला बसला. वतने, देवस्थाने, धर्म, व्यापारउदीम, इत्यादि सर्वच बाबतींत याला पुष्कळ नुकसान झाले होते. परंतु तेवढयाहि जुलुमांतून या वर्गाने आपला समाज बराचसा निभावून नेला. नेकी, प्रामाणिकपणा, धडाडी, चिकाटी, हे गुण या समाजांत वंशपरंपरेचे आहेत. व्यापारउदीम संभाळण्याची जवाबदारी माध्वसांप्रदायी वैष्णवांनी स्वीकारली होती व स्मातांनां राजकीय वर्चस्वापायीं त्रास भोगावे लागले होते. पण उभयतांनी मिळून आपले कर्तव्य शक्य त्या चिवटपणाने व धडाडीने केले आहे. वैश्यसमाज हा प्रारंभापासून स्थाईक असा वतनदार नव्हता. तरीपण व्यापाराची घडी पन: बसविण्यांत या समाजाने बरीच मोठी कामगिरी केली आहे. मराठा समाजाविषयी म्हणावयाचे तर ह्या समाजाने आपले सूळचे, उसळून वर निघण्याचे, जे गुण महाराष्ट्रात दाखविले होते, त्यांचाच थोडासा कोंकणी मासला पोर्तुगीजांना साऱ्या अमदानीत वेळोवेळी दाखविला आहे. सारे १८ वे शतक व १९ व्या शतकाच्या बऱ्याच मोठ्या भागांत ह्या समाजाने पोर्तुगीजांना यावच्छक्य त्रास दिला आणि आपला नाश जरी करून घेतला. तरी त्यापासून इतरांचे हित साधले. गोमंतकीय हिंदूंत एक मात्र विशेष मोठा महत्त्वाचा गुण दिसून येतो व तो हाच की, वतनी किंवा मालकी जमीन कितीहि क्षुल्लक असली तरी तिचा मोह त्याला अनावर असतो. याच सोहामळे त्यांनी त्रास भोगले, याच मोहामुळे त्यांना भयंकर संकटें भोगावी लागली. दुसरा महत्वाचा विशेष म्हणजे त्यांची धर्मप्रवृत्ति होय. तिच्यामुळे त्यांनी देशोधडीहि पतकरल्या. त्यांना चोरासारखें लपून छपून वावरावे लागले; गुन्हेगारासारखी धावपळीत वर्षेच्या वर्षे घालवावी लागली, नानाप्रकारची संकटें त्यांनी पतकरली, पण पूर्वसंस्कृति सोडली नाही. परवांच्या गावडे लोकांच्या शुद्धीत देखील हीच प्रवृत्ति उपयोगी