पान:गोमंतक परिचय.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय (सेक्रेटरिएट ) अंतर्गत मुलकी व्यवस्थेचे खातें, जमाबंदी खातें, जकात खातें, ( सर्व्हे खातें ), पब्लिकवर्क्स खातें, तार व टपाल खातें, आरोग्य खातें, जमीन मोजणी खातें, प्राथमिक शिक्षण, दुय्यम व नॉर्मलमध्ये अशा बहुतेक खात्यांतून बरेच महत्वाचे हुद्दे मिळविले आहेत. तथापि ह्या जागा अजूनहि हिंदूंच्या लोकसंख्येच्या प्रमाणांत नाहीत. अजूनहि ती मजल गांठावयाचीच आहे. आणि थोडक्याच वर्षीच्या अवधींत, हिंदुसमाज ती गांठल्याशिवाय राहावयाचा नाही, याची खात्री पटल्यामुळेच की काय, ज्यांच्या हाती आजवर हे कुरण मक्त्याप्रमाणे होते, त्यांचे हिंदुसमाजाविरुद्ध भगीरथ प्रयत्न चालत आहेत. वकीलीच्या धंद्यांतून आपल्या बुद्धिमत्तेस साजेशी जागा हिंदुसमाजाने अद्याप मिळविलेली नाही. ____भारत, हिंदु व प्रकाश व त्यानंतर प्रदीप ही वर्तमानपत्रे, ठिकठिकाणची वाचनालये व व्याख्यानमाला, शाळा, गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या उभयपक्षीय परिषदा, क्षत्रिय भंडारी शिक्षण परिषद, वैश्य परिषद्, दैवज्ञ ब्राह्मण परिषद, गोमंतकीय हिंदुसभा, मराठा गायकसमाजाची परिषद्, इत्यादि बाजूंनी गोमंतकीय समाज आपल्या उन्नतीचा प्रयत्न करीत असून, त्याच्या प्रयत्नाला आजवर तरी खंड पडला नाही.यंदा बोलावण्यात आलेलें महाराष्ट्र-साहित्य सम्मेलन हे देखील या प्रयनाचेंच एक अंग आहे. पुढे जरी योग्य स्थळी त्यांचा उल्लेख होणार असला, तरी साऱ्या गोमंतकांत मिळून वाङ्मयविषयक, शैक्षणिक, व्यायामविषयक, सामाजिक, राजकीय मिळून सुमारे ७० वर संस्था व्यवस्थितपणे चाललेल्या आहेत. मराठी शिक्षणाकरितां खेडोपाडी असणाऱ्या शाळा याखेरीज निराळ्याच आहेत. प्रागतिक संघः-राजकीय वर्चस्वाच्या बाबतींत-विशेषतः निवडणुकांतूनहिंदुसमाजांत सामदायिक आकांक्षा उत्पन्न करण्याचे सारे श्रेय आमच्या मतें प्रागतिक संघालाच द्यावे लागेल. इ. स. १९२०त फोंडे येथे आमचे मित्र दोतोर व्यंकटेशराव सरदेसाई यांना निवडणुकीत यश आल्याबद्दल झालेल्या लहानशा पानसुपारीच्या समारंभांत ह्या संस्थेची स्थापना व नामकरण झाले. परंतु तिचे कार्य इतकें फलद्रूप झालेले पाहाण्यास मिळेल असे त्या वेळी फारच थोड्यांना वाटलें असेल. प्रतिपक्षाकडून तर संघाविषयी प्रारंभी तरी थट्टेशिवाय कांहींच ऐकू येत नव्हत, परंतु हा भ्रम थोडाच वेळ टिकला. प्राझेरिझ दा कोश्तासारख्या जडबुडाच्या प्रतिनिधीला ज्या वेळी निवडणुकीत यशापयशाचा भरंवसा वाटेनासा झाला त्याच वेळी संघाबद्दल विरुद्ध पक्षांत थोडीशी जिज्ञासा उत्पन्न होऊ लागली. आणि आज...पण असो. संघांतील कार्यकारी मंडळाशी प्रस्तुत लेखकाचा पुष्क